वडापाव रेसेपी vada pav recipe in marathi

 

वडापाव रेसेपी vada pav recipe in marathi



वडापाव रेसिपी  (Vada Pav Recipe in Marathi) -


    वडापाव हा आपल्या महाराष्ट्र मधील सगळ्यात चविष्ट आणि कमी पैशांमध्ये मिळणारा पदार्थ आहे(Quick and Easy Indian Snacks)वडापावला प्रत्येक सीझनमध्ये खाऊ शकतो. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा म्हणलं तर तो प्रत्येक ऋतूमध्ये चविष्ट लागणारा पदार्थ आहे. तसंच लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणजेच ' वडापाव' आहे. तसंच खाद्य संस्कृतीमध्ये सर्वात जास्त पसंत पडणारा पदार्थ म्हणजेच वडापाव (Vada pav recipe in Marathi).

    प्रत्येकाला हा पदार्थ आवडतो असंच म्हणलं तरी चालेल! अस्सल मराठमोळा पदार्थ म्हणजेच वडापाव सगळ्यात अप्रतिम आणि चविष्ट पदार्थ हा असा वडापाव. तर मित्रांनो आज मी तुमच्यासमोर वडापाव कसा बनवायचा ते पण घरगुती  पद्धतीने कशा प्रकारे तयार करायचा ते दाखवणार आहे.


           वडापाव रेसिपी

वडापाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 1. सर्वप्रथम- 4 ते 5   बटाटे

2.  3 ते 4 चवीनुसार हिरवी मिरची

3.  चवीनुसार मीठ.

4.  2 चमचे  तेल

5.  4 ते 6 लसणाची पाकळी

6  1 ते वाटी बेसन

7.  1 वाटी तांदळाचे पीठ

 8. 2 ते 4 कढीपत्ताच्या पत्ते

9. चिमूट भर मोहरी

10   1 चमचा हळद.

चटणी बनवायची साहित्य–

1.   2 चमचे लाल तिखट

2. चवीनुसार मीठ

3. दोन लसणाची पाकळी किंवा चवीनुसार घेऊ शकता.

4.  हिरवी मिरची

5. वाटी बेसन.

वडे बनवण्याची प्रक्रिया

वडापाव रेसेपी vada pav recipe in marathi


    1. आपण आधी बटाटे उकडून घेऊया. तसेचलसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेऊया.

 

    2. त्यानंतर 1 ते ½ वाटी बेसन, 1 वाटी तांदळाचे पीठ एकजीव करून त्यामध्ये पुरेसे पाणी, हळद, मीठ याचे मिश्रण करून घेऊया. जर जास्त प्रमाणात वडे तयार करायचे असतील. तर आपण थोडे जास्त प्रमाणात बेसनाचे पीठ आणि तांदळाचे पीठ इथे घेऊ शकतो.

 

    3. तसेच आपण पॅनमध्ये दोन चमचे तेल, कढीपत्ता, मोहरी, हिरवी मिरची, लसूण पेस्ट, हळद याची फोडणी देऊन उकडलेले बटाटे सोडूया. तसेच दोन-तीन मिनिटापर्यंत मंद आचेवर होऊ द्यावा.

 

    4. तसेच पॅनमध्ये तेल गरम करून. वडे तयार करून बनवलेल्या बेसनाचे मिश्रण मध्ये डुबून सोडावे. त्यानंतर गरम तेलात सोडावे. वड्यांना पूर्णपणे ब्राऊन असा तपकिरी हलका रंग आल्यास वडे काढून घ्यावे.

 

अशीच तयार आहे. वडे.

लाल चटणी बनवण्याची प्रक्रिया:-

    1. चटणी बनवण्यासाठी बेसन पीठ आणि त्यामध्ये थोडसं पुरेसं पाणी घालून मिश्रण करून. गरम तेलात त्याची शेव बनवून घेऊया.

 

    2. त्यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची, लाल तिखट, चवीनुसार मीठ, बनवलेली शेव, मिक्सरमध्ये एकजीव करून घेऊ या.

 

अशीच तयार आहे लाल चटणी.


 

वडापाव रेसेपी vada pav recipe in marathi

        बाजारात किंवा मार्केटमध्ये मिळणारे पाव यासोबत तुम्ही बनवलेल्या वड्यांचा आणि लाल चटणीचा म्हणजेच.' वडापाव' आस्वाद घेऊ शकता

वडापाव विशेष टीप-

    1. वडापाव क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण त्यामध्ये तांदळाचे पीठ हे आवर्जून टाकावे जर तुमच्याजवळ तांदळाचे पीठ नसले तर तुम्ही ते बाजारात किंवा मार्केट मधून देखील तांदळाचे पीठ आणू शकतात तसेच बाजार किंवा मार्केटमध्ये तांदळाचे पीठ उपलब्ध नसले तर तुम्ही घरी देखील तांदळाचे पीठ बनवू शकतात आता तुम्हाला वाटेल की घरी तांदळाचे पीठ हे कसे बनवायचे तर त्यासाठी आपल्या घरातील एक वाटी तांदूळ घेऊन ते तव्यावरती तांदूळ हे ब्राऊन रंगाचे फ्राय होईपर्यंत म्हणजेच ब्राऊन रंगाची भाजून घ्यायचे आहे भाजून घेतल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक रव्यासारखे सुकी पेस्ट कशी बनवून घ्यायची आहे.

    2. तांदळाचे पीठ जर आपल्याला वडापाव मध्ये बनवताना ॲड करायचे असेल तर तांदळाचे पीठ मिक्सरमधून काढताना म्हणजे तांदूळ मिक्सर मधून काढताना त्यामध्ये पाणी न घालता त्याचे वाटण काढायचे आहे.

    3. तसेच वडापाव तळताना बेसन आणि तांदळाच्या पिठामध्ये जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा त्या बॅटरी मध्ये चिमूटभर सोडा देखील ऍड करायचा आहे म्हणजेच वडे हे पचायला चांगले जातील तसेच जर जास्त बेटर बेसन आणि तांदळाच्या पिठाचे उरलं असेल तर तुम्ही त्याचे भजे देखील फ्राय करून तेलात खाऊ शकतात.

    4. असे जर तुम्ही लाल चटणी बनवत असाल म्हणजेच वडापावची चटणी जर बनवत असाल तर उरलेलं बेसनाचे बॅटर हे नक्कीच त्या चटणीसाठी उपयोगी होईल आणि लाल चटणी ही बनवलेली फक्त दोन दिवस फ्रीजमध्ये टिकते त्यानंतर ती खराब होऊन जाते कारण ते बेसनाचं असतं त्यामुळे बेसनाचे पदार्थ लवकर शक्यतो खराब व्हायची शक्यता असते.

    5. तसेच जर चटणी नसेल वडापाव सोबत खायला तर तुम्ही आपल्या घरामध्ये असलेला म्हणजेच फ्रिजमध्ये अवेलेबल असलेला टोमॅटो सॉस देखील खाऊन याचा आस्वाद घेऊ शकतात तसेच त्यानंतर जर तुम्हाला लाल चटणी आणि टोमॅटो सॉस देखील खायला आवडत नसेल वडापाव सोबत तर तुम्ही हिरवी चटणी मात्र नक्कीच वडापाव सोबत खाऊ शकतात.

    6. हिरवी चटणी बनवायला फक्त एक वाटी पुदिना आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या तसेच एक अद्रक चा तुकडा पण चवीनुसार मीठ, एक वाटी कोथिंबीर या सर्वांचं एकजीव मिश्रण करून मिक्सर मधून काढून घ्यायचे आहे तसेच काढून घेतल्यानंतर एक थोडेसे त्यामध्ये पाणी ऍड करून एकदम थोडे पाणी त्यामध्ये ऍड करून हलक्या हाताने चमच्याने त्याला हलवून घ्यायचे आहे इथे आपली हिरवी चटणी पण तयार आहे.

    7. वडापाव सर्वांनाच आवडतो हे मला माहितीये पण माझे येणाऱ्या ब्लॉगिंग मध्ये मी बरेच तुम्हाला स्नॅक्स मधून खाद्यपदार्थ दाखवणार आहे ते म्हणजे समोसा असेल तसेच मुगाच्या डाळीची भजी आता पावसाळा ऋतू म्हणलं की मी तुम्हाला माझ्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये अजून पदार्थ म्हटले तर मसाला पाव तसेच साबुदाणा आणि साबुदाणा वडे असे मी बरेच तुम्हाला रेसिपीज दाखवणार आहे.

    8. तसेच हा घरगुती पद्धतीचा वडापाव तुम्हाला नक्कीच आवडेल आणि चवदार ही तितकाच होईल अशी मी खात्रीपूर्वक जाणीव देते तसेच जर वडापाव सोबत तुम्हाला चटणी बनवायचं कंटाळा आला असेल तर बाजारात मिळणाऱ्या हिरव्या मिरच्या किंवा आपल्या घरी असलेल्या हिरव्या मिरच्या त्या स्वच्छ धुऊन मध्ये भागून त्याला चिरून त्यामध्ये मीठ भरून त्यात तव्यावरती तेलात फ्राय करून तुम्ही वडापाव सोबत नक्कीच खाऊ शकतात आणि मला पूर्ण खात्री की त्या मिरच्या वडापाव सोबत खूप चवदार लागतात.

    9. वडापाव हे आदल्या रात्री बनवले की उरलेले वडापाव दुसऱ्या दिवशी देखील वडे तुम्ही खाऊ शकतात एवढे ते खायला आणि टिकायला देखील छान असतात जर वडापाव तुम्हाला तिखट करायचा असेल तर तुम्ही बटाट्याच्या चटणी मध्ये तुम्हाला जेवढी हवी तेवढी मिरची ऍड करू शकतात पण मी दोनच मिरच्या ऍड करू वडे बनवलेले आहेत पण तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही नक्कीच देखील हिरव्या मिरच्या ऍड करून ते बनवू शकतात.

    10. जर एखादी पिकनिक किंवा ट्रिप असली जर कुठे बाहेर जायचं प्लॅनिंग असतं तर ताबडतोब बनणारा पदार्थ म्हणजे वडापाव फक्त सोपा पर्याय म्हणजे बटाट्याची चटणी बनवा आणि बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र करून त्यामध्ये बटाट्याची चटणी चे गोल गोल वडे करून त्यामध्ये डुबून तळून काढा जर तुमच्याकडे पाव अवेलेबल कधी नसेल तर तुम्ही हे वडे पोळी सोबत देखील किंवा ज्वारीची भाकरी यासोबत देखील नक्कीच खाऊ शकतात आणि ते चवदार ही लागतील त्यामुळे पाव जर कधी अवेलेबल नसले तर तुम्ही भाकरी किंवा पोळी सोबत वड्यांचा आस्वाद घेऊ शकतात.

    11. तसेच वडे तळताना कढईमध्ये तळायचे आहे कारण कढईमध्ये तळताना वड्यांना कोटिंग हा चांगल्या प्रकारे येतो त्यामुळे ते कढईमध्येच तळायचे आहे तसेच वडे तळताना दोन ते तीन अंतराच्या दु रीवर राहून वडे हे तळायचे आहेत म्हणजेच वडे एखाद्या वेळेस कधी कधी फुटले तर ते अंगावर उडायची शक्यता देखील नसते.

    12. सुरुवातीला वडे तळताना वड्यांचा आकार हा छोटा छोटा असायला हवा एकदा की आपल्याला त्याचा अंदाज आला की तुम्ही मोठे आकारांचे वडे घेऊन ते कढईमध्ये तुम्ही तळू शकतात जर तुम्हाला बेसन आणि तांदळाचे पीठ चे बॅटर आहे त्यामध्ये जर गार्निशिंगसाठी कोथिंबीर ऍड करायची असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोथिंबीर ऍड करू शकतात.

    13. वडे हे तळताना कढईचा गॅस हा मंद आचेवरच असायला हवा जास्त हाय फ्लेमवर असला तर तेल हे आपल्या अंगावर उडायची शक्यता असते त्याच्यामुळे त्याची काळजी नक्कीच घ्यावी तसेच कुठलाही तुम्ही तळीव पदार्थ तळताना गॅस हा कमी आचेवरच असायला हवा जास्त आचेवर असला की तेल आपल्या अंगावर उडायची शक्यता असते किंवा डोळ्यांमध्ये तेल जायची सुद्धा शक्यता असते त्यामुळे याची चांगलीच काळजी घ्यावी.

    14. वड्यांमध्ये तळून झाल्यावर तेल भरपूर प्रमाणात असते वड्यांचे तेल जर नितळायचं असेल तर वडे हे प्लेटमध्ये काढताना अगदी काढायच्या आधी प्लेटमध्ये दोन-तीन टिशू पेपर ठेवायचे आहे आणि त्या टिशू पेपरवर वडे ठेवायचे आहेत म्हणजेच वड्यांचे तेल पूर्णपणे टिशू पेपरला लागून ते नितळल्या जातील.

 

तसेच तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !


 
Created by:-  Flavors by Akruti – A Culinary Journey Through Taste and Tradition.


0 Comments