महाराष्ट्रीयन साबुदाणा खिचडी रेसिपी - हे सुखाकर आणि स्वादिष्ट आहे
साबुदाणा खिचडी हा खाद्यपदार्थ एक पारंपारिक आणि घरगुती असं चविष्ट खाद्यपदार्थ आहे तसेच हा पदार्थ प्रत्येकाला आवडतो असेच म्हणलं जाईल. महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त साबुदाणा हा पदार्थ उपवासासला की खाल्ल्या जातो तसेच साबुदाणा या खाद्यपदार्थाचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे म्हणले तर साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खीर आणि साबुदाण्याचे घावन तसेच उपवासाची साबुदाण्याची खिचडी, तसेच साबुदाण्याची उसळ असे वेगवेगळ्या प्रकारचे या खाद्यपदार्थाला नावे दिलेली आहेत तसेच बरेच विद्यार्थी आणि कॉलेज मध्ये शिकणारे बॅचलर विद्यार्थी या मुलांना डब्याला साबुदाणा खिचडी ही अत्यंत आवडते तसेच बाहेर देखील
हॉटेलमध्येकिंवा मार्केटमध्ये साबुदाणा खिचडी ही उपभोगली जाते. लहान मुलांना देखील
हा खाद्यपदार्थ खूप आवडला जातो. तसेच मोठे मोठे देवस्थान किंवा मंदिर किंवा आषाढी एकादशी
असली तर साबुदाणा खिचडी हा खाद्यपदार्थ भंडारा म्हणून किंवा प्रसाद म्हणून दान केला
जातो. उपवास असला की या पदार्थाला खूप जास्त प्रमाणात खाल्ले जाते. तसेच नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास देखील
असताना साबुदाणा पदार्थ खाल्ल्या जातो. तर मित्रांनो आज मी तुमच्यासमोर अगदी चवदार आणि उत्तम प्रकारे ते
पण घरगुती पद्धतीने साबुदाणा खिचडी रेसिपी ही कशी तयार करायची मी तुम्हाला इथे सांगणार
आहे. तसेच पूर्णपणे खात्रीने तुम्हाला पण ही साबुदाणा खिचडी रेसिपी आवडेलच तर चला मित्रांनो
बघूया आज साबुदाणा खिचडी रेसिपी इन मराठी.
साबुदाणा खिचडी बनवायची सामग्री
1. चार ते पाच हिरव्या मिरच्या.
2. दीड कप साबुदाणा.
3. दोन बटाटे.
4. एक मोठा चमचा साजूक तूप.
5. दोन छोटे चमचे जिरे.
6. अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर.
7. पुरेसं पाणी.
8. चवीनुसार मीठ.
9. एक वाटी शेंगदाण्याचं बारीक चुरा.
साबुदाणा खिचडी बनवायची प्रक्रिया-
1. सर्वप्रथम आपण येथे साबुदाणा दोन तास आधी भिजवून घेणार आहोत. साबुदाणा हा भिजवायच्या आधी त्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे तसेच त्यानंतर त्याला धुताना त्यामधली पांढरी पावडर किंवा स्टार्च असेल तर ते काढायचे आहेत. साबुदाणा धुताना तुम्ही जाळी देखील घेऊ शकता तसेच धुतल्यानंतर त्याला दोन तास भिजू द्यायचे आहे.
2. तसेच साबुदाणा हा दोन तास भिजवून झाल्यावर आपण याला बनवायला घेणार आहोत तसेच त्यानंतर एक कढई किंवा मोठे पातेले घ्यायचे आहे ते घेतल्यानंतर त्यामध्ये आपण सर्वप्रथम एक मोठा चमचा तूप टाकणार आहोत तसंच तुप चांगल्या प्रकारे मंद आचेवर गरम झाल्यास त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत तसेच त्यानंतर जिरे टाकल्यावर जिऱ्यांचा आणि साजूक तुपाचा खमंग वास यायला लागतो. तसेच त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकणार आहोत.
3. तसेच त्यानंतर हिरवी मिरची टाकल्यावर त्याला एक ते दोन मिनिटं चांगल्या प्रकारे
फ्राय होऊ द्यायचे आहे फ्राय करून झाल्यास त्यामध्ये आपण बटाटे कापून त्यामध्ये
टाकणार आहे तसेच बटाटे हे कापून टाकायचे आधी बटाट्यावरील पूर्ण साल काढून
त्याला स्वच्छ धुऊन कट करून टाकणार आहोत. तसेच बटाटे हे मंद आचेवर गॅस करून पूर्ण ब्राऊन होईपर्यंत
म्हणजेच तपकिरी रंगाचे बटाटे हे होईपर्यंत त्याला आपण चांगल्या प्रकारे फ्राय करणार
आहोत.
4. तसेच त्यानंतर बटाटे हे तपकिरी रंगाचे झाल्यास आपण त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा हा टाकणारा आहोत. साबुदाणा हा भिजवताना त्यामध्ये जास्त पाणी घालायचे नाही कारण जास्त पाणी घातल्यास तो चिकट असा तयार होऊ शकतो. त्यामुळे साबुदाणा हा भिजवल्यानंतर बनवताना फळफळीत म्हणजेच सुटलेला मोकळा दिसला पाहिजे. तसेच त्यानंतर आपण साबुदाणा त्यात टाकणार आहोत साबुदाणा टाकल्यानंतर लगेचच वरतून भाजलेला शेंगदाण्याचा चुरा आपल्याला त्या वरतून टाकायचा आहे.
5. तसेच त्यानंतर त्याला पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे आहे साबुदाण्याला पूर्णपणे एकजीव केल्यानंतर त्यामध्ये आपण वरतून चवीनुसार मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण त्याला परत पूर्णपणे एकजीव करणार आहोत तसेच तुम्ही अर्धा छोटा चमचा साखर देखील टाकू शकता म्हणजेच साबुदाण्याला अजून चव येते पण हे तुमच्या इच्छेवर आहे की तुम्हाला साबुदाण्यात साखर टाकायची का नाही साखरही ऑप्शनल आहे .
6. तसेच त्यानंतर त्याला एकजीव करून घेतल्यानंतर मंद आचेवर त्याला झाकून एक चार ते पाच मिनिट साबुदाण्याच्या खिचडीला वाफवून घ्यायचे आहे गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे जास्त मोठा केल्यास साबुदाणा खिचडी ही जळायची शक्यता असते . त्यानंतर साबुदाणा खिचडी वाफवून झाल्यास त्या वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आपण स्प्रिंकल करून घेणार आहोत. म्हणजेच साबुदाणा हा अजून चवदार आणि छान देखील दिसतो. तसेच त्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत साबुदाणा खिचडी तुम्ही दही सोबत खाऊ शकता किंवा बाजारात मिळणाऱ्या केळी तसेच साबुदाणा खिचडी खाताना वरतून तुम्ही एक लिंबू पिळून देखील खाऊ शकतात.
साबुदाणा खिचडी ही पूर्णपणे आरोग्यदायी आहार आहे, आणि आपल्याला या विषयावर विस्तृत माहिती मिळवायला याची प्रयत्न केलेली जाईल. आपल्याला ही खिचडी घरी तयार करायला आवडेल किंवा उपवासाच्या दिवसांत आनंद घेण्यासाठी ही विशेष आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी मदत करेल.
तर तयार आहे साबुदाणा खिचडी ती पण घरगुती पद्धतीने तर मग तुम्ही
देखील साबुदाणा खिचडी हे प्रत्येकाच्या
ह्रदयात एक विशेष स्थान आहे, विशेषतः उपवासाच्या दिवसांतील
आपल्या सार्वजनिक अन्नाने ती जमलेली असते. ह्या आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपीला
आपल्या दैनंदिन जीवनात एक घटक बनवा,
ज्यामुळे आपलं आरोग्य
बद्धल तसेच आपल्या जीवनाची सुखे भरभराट सुरू होईल.
लवकरच साबुदाणा खिचडी रेसिपी बनवा.
शाबुदाणा खिचडीसाठी काही टिप्स:-
1. शाबुदाणा खिचडी शिजवताना हे लक्षात ठेवा की साबुदाणा
हा कमीतकमी 3 - 4 तास पाण्यात भिजूघाला किंवा तुम्ही ते मऊ होईपर्यंत रात्रभर देखील भिजवू शकता.
2. शाबुदाणा रेसिपी मध्ये वापरण्यापूर्वी जास्तीचे पाणी काढून टाका.
3. चिकट किंवा जळू नये म्हणून खिचडीला कमी ते मध्यम आचेवर शिजली आहे याची खात्री
घेणे आवश्यक आहे.
4. खिचडी अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही काही उकडलेले आणि कापलेले बटाटे किंवा
गाजर आणि मटार सारख्या शिजवलेल्या भाज्यादेखील घालू शकता.
5. तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या किंवा तिखटाचे आणि मसाल्याचे प्रमाण समायोजित करा.

.png)
.png)

0 Comments