आप्पे रेसिपी मराठीत : घरच्या घरी नक्कीचं बनवा!
आप्पे हा खाद्यपदार्थ तांदळापासून बनवल्या जाणारा पदार्थ आहे. सर्वांना हा पदार्थ आवर्जून आवडतोच हे मला माहिती आहे . आप्पे हा पदार्थ केरला आणि साउथ इंडियन मध्ये जास्त प्रमाणात खाल्ल्या जातो. या पदार्थाला सर्वजण खूप पसंती देत आहे. हा पदार्थ तांदळापासून बनवून केला जातो. तसे याच पदार्थांमध्ये अनेक प्रकार आहेत. म्हटलं तर इडली, डोसा आणि मेंदू वडा तसेच तांदळाचे घावन. असे बरेच प्रकारचे पदार्थांमध्ये तांदळाचे आप्पे हा एक खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्र मध्ये देखील या पदार्थाला जास्त प्रमाणात पसंती आहे. आणि महाराष्ट्रा मध्ये हा पदार्थ सर्वांना भरपूर प्रमाणात आवडतो. बाजारात आणि साउथ इंडियन स्पेशल हॉटेलमध्ये या पदार्थाचा आस्वाद घेतला जातो.
या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन आणि प्रोटीन आहे. या पदार्था सोबत सांबर नावाची आमटी बनवून खाल्ल्या जाते. तसेच यासोबत या खाद्य पदार्थ सोबत खोबऱ्याची चटणी देखील खाल्ल्या जाते. आप्पे सोबत खोबऱ्याची चटणी अतिशय खायला सुंदर आणि चमचमीत लागते. बरेच लोकं खोबरं असं खात नाही पण याची चटणी बनवल्या नंतर आवर्जून सर्वांना ती भरपूर प्रमाणात खायला आवडते. तसेच हा जो तांदळाचे आप्पे हा खाद्यपदार्थ आपल्या दैनंदिन जीवना मध्ये आपल्या आहारा मध्ये समावेश केला पाहिजे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये भाजी पोळी खाऊन कंटाळा आला की तसेच मांसाहारी अन्न खाऊन देखील कंटाळा आल्या नंतर बऱ्याच घरोघरी हा पदार्थ बनवला जातो. ज्या दिवशी घरामध्ये सर्वांना सुट्टी असते त्या दिवशी हा खाद्यपदार्थ आवर्जून महिला बनवतात.
लहान
मुलांना देखील हा खाद्यपदार्थ म्हणजे तांदळाचे आप्पे भरपूर प्रमाणातआवडतो. तेच म्हातारी माणसं देखील या पदार्थाला
आवर्जून खातात. तांदूळ बऱ्याच लोकांना खायला आवडत नाही. परंतु तांदळापासून बनवलेला
हा खाद्यपदार्थ बऱ्याच लोकांना आवडल्या जातो. तसेच आजची माझी रेसिपी ही तांदळाचे आप्पे
आहे. आज माझ्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला तांदळाचे आप्पे रेसिपी इन मराठी ही दाखवणार
आहे. तसेच तांदळाच्या आप्पे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्रीपूर्वक
जाणीव आहे. चला तर मग बघूया तांदळाचे आप्पे.
आप्पे
आप्पे बनवण्याची सामग्री:-
1.चार वाटी तांदूळ.
2.दोन वाटी उडदाची डाळ.
3.दोन कांदे.
4.खायचा सोडा चिमूटभर.
5.चवीनुसार मीठ.
6.पुरेसं तेल.
7.आप्पे बनवायचा तवा.
आप्पे बनवायची प्रक्रिया:-
1. सर्वप्रथम आपण येथे तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ धुऊन घेणारा आहोत दोन ते तीन
पाण्यामध्ये तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. म्हणजे त्यामध्ये जो काही
कचरा असेल तो निघून जातो. तसेच त्यानंतर आपण एक मोठी पातेले घेऊन तांदूळ तीन ग्लास
पाणी टाकून भिजू घालणार आहोत. तांदळाला सहा घंटे आधी भिजू घालायचे आहे तसेच त्यानंतर
सोबतच एका दुसऱ्या भांड्यामध्ये उडदाची डाळ देखील दोन ग्लास पाणी टाकून भिजू घालणार
आहोत.
2. तसेच उडदाची डाळ देखील सहा घंटे आधी भिजू घालायची आहे. तसेच सहा घंटे झाल्यानंतर
ते चांगल्या प्रकारे भिजल्या जाते. तसेच ते
भिजल्यानंतर उडदाची डाळ आणि तांदूळ थोडे थोडे करून मिक्सरमधून एकत्र बारीक करून घ्यायचे
आहे. तसेच बारीक एकदम त्याला बारीक करायचं आहे पाणी टाकून थोडे थोडे त्याला बारीक करून
तांदळाचे आणि उडदाच्या डाळीचे चांगल्या प्रकारे
मॅटर बनवून घ्यायचे आहे तसेच बॅटर बनवून झाल्यानंतर त्याला त्यामध्ये एक ग्लास पाणी
टाकून आणि चमच्याने पूर्णपणे हलवून एक रात्रभर झाकण ठेवून तसेच राहू द्यायचे आहे.
3. तसेच रात्रभर त्याला ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला बनवायला घ्यायचं
आहे तसेच ते बनवताना तुम्ही त्याबॅटर मध्ये दोन कांदे चिरून टाकायचे आहे तसेच दोन कांदे
चिरून टाकल्यानंतर त्या बॅटरमध्ये खायचा सोडा देखील एक चमचा टाकायचा आहे म्हणजेच आप्पे
ही चांगल्या प्रकारे फुगल्या जातात आणि तसेच चवीनुसार वरतून मीठ घालायचे आहे आणि मग त्यानंतर सर्वांना म्हणजेच त्या बॅटरला
एकजीव करून घ्यायचे आहे.
4. तसेच आप्पे बनवायचा तवा घेऊन तो मंद आचेवर गॅस करून ठेवायचा आहे आणि तो तवा ठेवल्यानंतर
त्यामध्ये लगेच आप्पे घालायचे जे गोल गोल साचे आहेत त्यामध्ये आपल्या हाताने तेल लावून
घ्यायचे आहे म्हणजे आप्पे हे चिटकत नाही. तसेच सगळीकडे तेल लावून घेतल्यानंतर लगेचच
चमच्याने गोल चमचा घेऊन किंवा गोल पळी घेऊन त्या गोल गोल साच्यामध्ये आप्पे बनवलेलंबेटर
भरायचा आहे.
5. तसेच ते भरल्यानंतर त्याला झाकून एक पाच ते दहा मिनिटं चांगल्या प्रकारे शिजू द्यायचे
आहे. तसेच पाच ते दहा मिनिटे झाल्यानंतर झाकण उघडून चाकूने त्याला दाबून टच करून बघायचे
आहे की ते शिजले की नाही. जर ते नसेल शिजल्यास परत झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे त्याला
होऊ द्यायचे आहे. मग ते झाल्यानंतर लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तसेच त्याला
जास्त वेळ गॅस वरती मंद आचेवर ठेवले की ते कुरकुरीत देखील बनतात पण ते तुम्हाला कुरकुरीत
हवे की नाही हे ऑप्शनल आहे तसेच इथे आपले आप्पे तयार आहेत.
खोबऱ्याची चटणी
खोबऱ्याची चटणी बनवायची सामग्री:-
1.एक ओलं खोबरं.
2.दोन चमचे जिरे.
3.एक चमचा मोहरी.
4.फुटाण्याची रेडीमेड डाळ म्हणजेच डाळवा.
5.पुरेसं तेल.
6.चवीनुसार मीठ.
7.दोन ते तीन हिरव्या मिरच्या.
8.दोन ते तीन कढीपत्त्याची पानं.
9.चार ते पाच लसणाच्या पाकळ्या.
खोबऱ्याची चटणी बनवायची प्रक्रिया:-
1. सर्वप्रथम आपण येथे ओलं खोबरं घ्यायचं आहे तसेच त्याचे बारीक तुकडे करायचे आहे
तसेच ओल्या खोबऱ्याची बारीक तुकडे केल्यानंतर आपण लगेच मिक्सरमध्ये त्याला टाकायचे
आहे मिक्सरमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये फुटाण्याची डाळ म्हणजेचरेडीमेड डाळवा अर्धा वाटी टाकायचा आहे त्याच
मिक्सरच्या भांड्यामध्ये तसेच हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या देखील त्यामध्ये
टाकायच्या आहेत आणि हे सर्व टाकल्यानंतर मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे त्याला बारीक
पेस्ट करून घ्यायची आहे. तसेच त्यामध्ये एक
ग्लास पाणी ऍड करून त्याला थोडे पतले करायचे आहे.
2. तसेच बारीक पेस्ट झाल्यानंतर एका भांड्यामध्ये ती पेस्ट टाकायची आहे आणि साईडला
एका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे तसेच
दोन चमचे तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर लगेच त्यामध्ये कढीपत्त्याची पाने आणि
जिरे आणि तसेच मोहरी देखील वरतून टाकायचे आहे लगेचच टाकल्यानंतर जिरे आणि मोहरी तडतडा
वाजायला लागतात आणि कढीपत्त्याची पानं याचा देखील फोडणीचा वास येऊ लागतात गॅस बंद करून
त्या बनवलेल्या पेस्टमध्ये टाकायचं आहे.
3. तसेच टाकल्यानंतर वरतून चवीनुसार मीठ देखील टाकायचे आहे आणि चमच्याने त्याला हलवून घ्यायचे आहे. तसेच खोबऱ्याची चटणी देखील आपली रेडी आहे.
सांबर
सांबर बनवायची प्रक्रिया:-
1.एक वाटी मसूर डाळ.
2.चवीनुसार मीठ.
3.दोन ते चार कडीपत्त्याची पान.
4.पुरेसे तेल.
5 .चिमूटभर मोहरी आणि जिरे.
6.चवीनुसार थोडीशी साखर.
7. एक तुकडा चिंचेचा.
8. एक चमचा हळद.
9. तीन चमचे लाल तिखट.
10.चार ते पाच शेवग्याच्या शेंगा.
11.दोन ते तीन भोपळ्याचे तुकडे.
12.पुरेसं पाणी.
13.सांबर मसाला.
14.एक वाटी चिरलेली बारीक कोथिंबीर.
सांबर बनवायची प्रक्रिया-
1. मसुराची डाळ ही कुकरला लावून घ्यायची आहे तसेच मसुराची डाळ कुकरला लावताना त्यामध्ये
एक चमचा हळद आणि शेवग्याच्या शेंगाचे तुकडे कट करून टाकायचे आहे तसेच त्यासोबत भोपळ्याचे
तुकडे देखील टाकायचे आहे म्हणजेच ते कुकरला चांगल्या प्रकारे शिजल्या जातात जर तुमच्याकडे
भोपळा नसेल तर काही हरकत नाही. तसेच हे सगळे कुकरला पाच ते सात शिट्ट्या लागतात शिजवून
घ्यायची आहे.
2. तसेच मसुरेची डाळ शिजून झाल्यानंतर लगेचच आपण त्याला फोडणी द्यायला घेणार आहोत.
असेच एक मोठे भांडे घ्यायचे आहे. तसेच भांडे
घेतल्यानंतर ती गॅसवर ठेवून गॅस मंद आचेवर करायचा आहे तसेच त्यानंतर त्यामध्ये पुरेस
तेल घालून घ्यायचे आहे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर जिरे आणि चिमूटभर
मोहरी ऍड करायची आहे. तसेच ॲड केल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने देखील टाकायची
आहे.
3. तसेच याचा खमंग वास येतात यामध्ये सांबर मसाला आणि लाल तिखट ॲड करायचा आहे आणि
ते एक ते दोन मिनिटे चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे तसेच फ्राय झाल्यानंतर
त्यामध्ये चिंचेचा तुकडा देखील टाकायचा आहे. पुन्हा एकदा त्याला थोडेसे फ्राय करून
घ्यायचे आहे तसेच ते झाल्यानंतर शिजवलेली डाळ आणि त्यामध्ये असलेले शेवग्याचे तुकडे
आणि भोपळ्याचे तुकड शिजलेले टाकायचे आहेत.
4. हे सगळे लगेच टाकायचे आहे टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचे आहे तसेच एकजीव
झाल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी ऍड करायचे आहे पाणी ऍड केल्यानंतर चवीनुसार मीठ
आणि थोडीशी चवीनुसार साखर ऍड करायची आहे. तसेच वरतून बारीक चिरून कोथिंबीर ऍड करायची
आहे. चांगल्या प्रकारे सांबरला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा
आहे तसेच तुमचा सांबर देखील इथे रेडी आहे.
विशेष टीप-
1. आप्पे बनवताना त्याच्या बॅटरमध्ये दोन कांदे चिरून टाकावी म्हणजे कांदे चिरल्यानंतर
ते चांगल्या प्रकारे आप्पे फुगतात.
2. सांबर बनवताना त्यामध्ये भोपळ्याचे तुकडे नसतील तर काही हरकत नाही पण शेवग्याची शेंगाचे तुकडे सांबर मध्ये नक्कीच असायला हवी.
3. आप्पे बनवताना त्याच्या बॅटर मध्ये चिमूटभर सोडा टाकायचा आहे चांगल्या प्रकारे
ते शिजल्या जातात. आप्प्याचे बेटर हे अगदी बारीक हवं जास्त जाडसर असले की ते शिजायला
होत नाही.
तसेच तुमचं मनःपूर्वक धन्यवाद !
Created by:- Flavors by Akruti – A Culinary Journey through taste and Tradition

.webp)
.webp)
.webp)

0 Comments