मूग डाळ भजी : खास मराठी रेसिपी | मूग डाळ भाजी रेसिपी | Moong Dal Bhaji | How to make Moong Dal Bhaji Recipe

मूग डाळ भजी : खास मराठी रेसिपी


मूग डाळ भजी : खास मराठी रेसिपी | मूग डाळ भाजी रेसिपी | Moong Dal Bhaji | How to make Moong Dal Bhaji Recipe


        पावसाळा ऋतू आला की आपल्याला गरमा- गरम पदार्थ खाऊशे वाटतात, मगकांदा भजी, पापड किंवा पुऱ्या ही अशी घरगुती पदार्थ खाऊशे वाटतात. पण रोजच पाऊस पडायला लागला की, आपल्याला कांदा भजी खाऊन कंटाळा आल्यास दुसरे पदार्थ खायची इच्छा होती. तर तसेच मित्रांनो मी आज तुमच्यासमोर मुगाच्या डाळीची भजी कशी बनवायची ते सांगणार आहे. बऱ्याच जणांना मुगाची डाळ ही आवडत नाही पण मात्र मुगाची डाळ खाणे हे खूप फायदेशीर असते. मुगाच्या डाळीने अन्नपचन चांगले होते. तसेच त्या डाळीमध्ये खूप पोषण असते. पोटॅशियम


        मॅग्नेशियम या डाळीमध्ये असते. तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा मुगाची डाळ खूप उपयुक्त असते. लहान मुलांना मुगाची डाळ खायला जास्त दिली जाते. मुगाची डाळीमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते आणि प्रोटीन देखील असते. तसेच मित्रांनो दैनंदिन जीवनात आपल्या आहारात मुगाच्या डाळीचा समावेश केला पाहिजे. बऱ्याच जणांना मुगाची डाळ आवडत नाही. तर तिचा उपभोग कसा घ्यायचा तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची भजी कशी बनवायची आहे ते इथे सांगणार आहे.

 मुगाची डाळीचे भजी बनवायची सामग्री-

  • दीड वाटी मुगाची डाळ.
  • एक वाटी बेसन.
  • एक वाटी तांदळाचे पीठ.
  • दोन चमचे लाल तिखट.
  • एक चमचा हळद.
  • चवीनुसार मीठ.
  • पाच ते सहा हिरव्या मिरच्या.
  • पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या.
  • एक चमचा ओवा., पुरेसं पाणी.
  • अर्धी वाटी चिरलेली हिरवी कोथिंबीर.
  • एक चमचा गरम मसाला.
  • भजी तळण्यासाठी पुरेसं तेल.

मुगाची डाळीची भजी बनवायची कृती-

  • सर्वप्रथम आपण इथे मुगाची डाळ ही अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत तसेच त्यानंतर भिजवून झाल्यावर डाळीला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत.

  • मुगाची डाळ अर्धा तास आधी भिजवल्यास ती छान फुगते आणि नरम होते आणि भजीला छान चव येते.तसेच त्यानंतर आपण एक बाऊल घेणार आहोत, त्यामध्ये बेसन मिक्सरमध्ये वाटलेली डाळ आणि तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, हिरवी मिरची लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, ओवा आणि पुरेसं पाणी त्यामध्ये टाकणार आहोत.

  • तसेच त्यानंतर जास्त घट्ट आणि जास्त पातळ नाही, असे बॅटर आपण इथे तयार करणार आहोत. तसेच त्यानंतर बनवलेलं बेटर एक दहा ते पंधरा मिनिटं त्यावर प्लेट झाकून ठेवून देणार आहोत.

  • तसेच त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे झाल्यावर, बनवलेल्या बॅटर चमच्याने थोडेसे हलवून घेणार आहोत. तसेच त्यानंतर एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल गरम करायला घेणार आहोत. गरम झाल्यास त्यामध्ये हातघालून बॅटर मध्ये छोटे छोटे गोळे करून, गरम तेलात सोडायचे आहे.

  • तसेच तेलामध्ये गोळे सोडल्यास ते खाली कढई ला चिटकता कामा नाही. याची इथे काळजी आपण घेणार आहोत. त्यानंतर भजी पूर्णपणे तपकिरी अशी ब्राऊन रंगाची झाल्यास त्याला बाहेर काढायचे आहे.

  • 6. भजी तळून झाल्यास त्यावर चिरलेली हिरवी कोथिंबीर वरतून टाकायची आहे. तर तयार आहे पावसाळ्यात ऋतू मधली गरमागरम मुगाच्या डाळीची भजी. तसेचभजीला तुम्ही सॉस किंवा जेवताना पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता.

मुगाच्या डाळीची भजी विशेष टीप-


1. मुगाची डाळीची भजी बनवताना त्यामध्ये कंपल्सरी चिमूटभर सोडा टाकायचा आहे कारण सोडा टाकल्यानंतर मुगाच्या डाळीची भजी ही पचायला चांगली जातात आणि किती जरी जास्त मुगाची डाळीची भजी खाल्ली तर आपले पोट सुद्धा दुखत नाही म्हणून मुगाची डाळीची भजी बनवताना त्यामध्ये सोडा आवर्जून टाकावा.


2. मुगाच्या डाळीची भजी बनवताना त्यामध्ये सोडा टाकला तर ती अजून खुसखुशीत देखील होतात तसेच मुगाच्या डाळीचे भजेच बॅटर बनवताना त्यामध्ये जर आपण तांदळाचे पीठ देखील टाकले तर भजे अगदी छान होतात तसेच मुगाची डाळ ही जास्त कोणी खात नाही किंवा कोणाला जास्त आवडत सुद्धा नाही त्यामुळे त्याची भजेच बनवून सर्वांना खायला द्यायचे आहे.


3. मुगाच्या डाळीची भजी जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही त्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर जास्त प्रमाणात करू शकतात


4. मुगाच्या डाळीची भजी जर पोळी सोबत खायला आवडत नसेल तर तुम्ही घरातील आपल्या टोमॅटो सॉस सोबत देखील मुगाच्या डाळीची भजी खाऊ शकतात आणि टोमॅटो सॉस सोबत तर मुगाच्या डाळीची भजी म्हणजे कुठलीही कांदा भजी बटाटा भजी ही छानच लागते.

 

तसेच तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !


Created by:-  Flavors by Akruti – A Culinary Journey Through Taste and Tradition.

 

0 Comments