वरण भात | वरण रेसिपी | वरण भात रेसिपी मराठीत varan bhaat | Varan Recipe | varan bhat recipe in marathi

 

वरण भात रेसिपी | Varan Bhat Recipe in Marathi

वरण भात | वरण रेसिपी | वरण भात रेसिपी मराठीत varan bhaat | Varan Recipe | varan bhat recipe in marathi


         रोजच्या दैनंदिन जीवनात भाजी पोळी खायचा, कंटाळा आला कीआपण लाईटली खिचडी किंवा वरण-भात खातोतसेच, वरण-भात हा प्रत्येकाला आवडणारं जेवण आहेभूक लागल्यावर लहान मुलांना वरण-भात दिल्यास त्यांच जेवण अत्यंत असं भरपेट होतं. तसेच मोठे व्यक्ती सुद्धा आजारी पडल्यास किंवा तोंडाची चव नसल्यास, वरण भात खाल्ला की तोंडाला चव येते.

        तसेच जेवणामध्ये सगळ्यात उत्कृष्ट आणि योग्य आहार म्हणजेचवरण-भात हा आहे. तर मी आज मित्रांनो, तुमच्यासमोर वरण-भात हा कसा बनवायचा हे सांगणार आहे.

वरण बनवायचे साहित्य-

§  एक वाटी तूर डाळ.

§  एक चमचा हळद.

§  चार ते पाच कढीपत्त्याची पानं.

§  एक चमचा जिरे.

§  एक चमचा मोहरी.

§  चवीनुसार मीठ.

§  दोन ग्लास पाणी.

§  8. चार ते पाच लसणाच्या पाकळ्या.

§  9. दोन चमचे तेल.

वरण बनवण्याची प्रक्रिया-

  • सर्वप्रथम आपण इथे तूर डाळ ही कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालून शिजवून घेणार आहोत. तसेच शिजवून घेतल्यावर कुकर थंड होईपर्यंत, एक भांडे घेऊन त्यामध्ये, तेल घालून ते गरम झाल्यास.

वरण भात | वरण रेसिपी | वरण भात रेसिपी मराठीत varan bhaat | Varan Recipe | varan bhat recipe in marathi


  • त्यामध्ये जिरे आणि मोहरी ची मंद आचेवर फोडणी देत, त्यामध्ये कढीपत्ताघालून त्याची फोडणी द्यायची आहे. कढीपत्ता हा वरणामध्ये असला ही छान असा वरणाला सुगंध येतो. तसेच वरण चवदार ही होते.

  • तसेच त्यानंतर लसणाच्या पाकळ्या सोडणार आहोत, लसणाच्या पाकळ्यांना मंद आचेवर फोडणी देताना त्याचा छानसा गोल्डन रंग यायला हवा. तसेच त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे.

  • तसेच फोडणी झाल्यावर शिजवून घेतलेली तुरीची डाळला फेटून घ्यायची आहे. डाळीला फेटून घेतलं की, मग ती फोडणी दिलेल्या भांड्यामध्ये लगेचच टाकायची आहे

  • तसेच त्याला चमच्याने पूर्णपणे हलवून घ्यायचे आहे आणि हवे तेवढे पुरेसे पाणी वरण मध्ये टाकायचे आहे मग त्यानंतर वरण ला दहा ते पंधरा मिनिटे मंद आचेवर उकळी येऊ द्यायची आहे तसेच उकळी येताना चवीनुसार मीठ आपण वरणामध्ये घालणार आहोत

  • वरण बनवताना तुम्ही त्यामध्ये आमसूल किंवा चिंच घालू शकतात हे ऑप्शनल आहे. आमसूल किंवा चिंच वरण बनवताना वरणामध्ये टाकल्यास, वरण हे छान असे आंबट - गोड होते.

  • तसेच आता आपण कुकरमध्ये दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुऊन आणि निवडून टाकणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तीन इंच पाणी घालणार आहोत. तसेच त्यानंतर कुकरला फक्त तीन शिट्ट्या देऊन भात हा शिजवून घ्यायचा आहे.

वरण भात | वरण रेसिपी | वरण भात रेसिपी मराठीत varan bhaat | Varan Recipe | varan bhat recipe in marathi


तर मित्रांनो इथे आपलं वरण आणि भात तयार आहे.

वरण-भात विशेष टीप-

1. वरण बनवताना जर तुम्हाला ते तिखट लागत असेल तर फोडणी देताना तुम्ही त्यामध्ये दोन ते चार हिरव्या मिरच्या कट करून टाकू शकतात तसेच जर तुम्हाला वरण भातामध्ये वरण बनवताना त्यामध्ये टोमॅटो देखील कट करून ऍड करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टोमॅटो हे त्याच्यात टाकू शकतात.


2. तसेच वरण-भात सोबत खाताना तुम्ही तोंडी लावायला लोणचे देखील खाऊ शकतात किंवा उडदाचे आणि तांदळाचे पापड देखील तळून तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकतात तसेच काकडीची कोशिंबीर देखील तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकतात आणि सर्वात उत्तम म्हणजे वरण भातासोबत तुम्ही वरण भात खाताना वरतून तूप टाकून देखील खाऊ शकतात.


3. तसेच वरण बनवताना तुम्हाला ते फोडणी द्यायची कंटाळा आल्यास साधे तेल मीठ हळद टाकून देखील तुम्ही त्याला कुकरला लावू शकता म्हणजेच साधारणवरण-भात  देखील तुम्हाला खायचा असेल तर अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला खाऊ शकतात.


4. बरेच लोकं हे वरण बनवताना घरात वर्णनाला तुरीची डाळ नसली तर ते मुगाची डाळ शिजवून मुगाच्या डाळीचे सुद्धा वरण बनवतो जर तुम्हाला तुरीची डाळ ही पचत नसेल तर तुम्ही मुगाची डाळ याच सुद्धा वरण बनवू शकतात तसेच जर दोन्ही डाळ पचायला अवघड जात असे तर वरण बनवताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचे आहे म्हणजेच वरण भात किती जरी खाल्ला तर तो पचायला अगदी सोपा जाईल.


5. तसेच वरण भात खाताना तुम्ही त्यासोबत वरतून लिंबू जरी पिळून खाल्ला तर वरण भात एकदम छान लागतो तसेच दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या आहारामध्ये वरण भाताचा समावेश नक्कीच पाहिजे जेवायला पण दोन घास आपल्याला जास्त जातात त्यामुळे मुगाच्या डाळीचा असो किंवा तुरीच्या डाळीचा असो वरण-भात ही नक्कीच जेवणामध्ये असायला हवं.


6. तसेच वरण बनवताना तुम्ही त्यामध्ये लसूण ठेचून देखील टाकू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढे लसूण हवे तेवढे तुम्ही वर्णांमध्ये ऍड करू शकतात.


तसेच तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !

 

Created by:-  Flavors by Akruti – A Culinary Journey Through Taste and Tradition.


0 Comments