चिकन कंटकी – कुरकुरीत रेसिपी आणि घरचं आनंद | Hot and crispy Chicken Recipe

 

चिकन कंटकी कुरकुरीत रेसिपी  आणि घरचं आनंद!

चिकन केंटकी – कुरकुरीत रेसिपी  आणि घरचं आनंद | Hot and crispy Chicken Recipe


        आता चिकन हा जवळपास सगळ्याच लोकांचा आवडता मांसाहारी खाद्यपदार्थ आहे. तसेच चिकन बिर्याणी असो किंवा चिकनची झणझणीत भाजी असो तर सर्वांनाच या खाद्यपदार्थाची ओढ आहे. तसेच चिकन मधील रोस्टेड चिकन किंवा चिकन चायनीज किंवा चिकन कंटकी म्हटलं तरी चालेल. असा या खाद्यपदार्थाचा प्रकारांमध्ये उपभोग घेतला जातो.


        काही काही लोकांना रोज जरी चिकन म्हटलं तरी हा खाद्यपदार्थ त्यांना खायला आवडतोच. असेच चिकन खाल्ल्याने शरीरातील ताकद वाढते आणि हाडे देखील मजबूत होतात. तसेच चिकन सूप देखील पिल्याने  आपल्या शरीराचे स्नायू बळकट होतात. तसेच चिकन या खाद्यपदार्थां मध्ये प्रोटीन देखील भरपूर प्रमाणात आहे. तसे आपण डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर देखील आपल्याला चिकनची सूप किंवा चिकन हे खाण्याचे सल्ले देतात.


         दररोज एक्सरसाइज आणि जिम करणारे व्यक्ती देखील त्यांच्या दैनंदिन जीवना मध्ये त्यांच्या आहारा मध्ये चिकन या खाद्यपदार्थाचा समावेश करतात. तसेच लहान मुलांनी देखील त्यांच्या दैनंदिन जीवना  मध्ये रोजच्या आहारात चिकनचा समावेश करावा. तसेच गर्भवती महिलांना देखील चिकन खाणे हे अगदी महत्त्वपूर्ण आहे. आजची रेसिपी आहे चिकन कंटकी इन रेसिपी. चिकन कंटकी हा पदार्थ सर्वांचाच आवडता पदार्थ आहे.


        सर्वांनाच हा आवर्जून आवडल्या जातात आणि मुंबई, पुणे आणि  दिल्ली या अशा मोठ्या नामांकित शहरांमध्ये याची जास्त प्रमाणात विक्रेती होते. पण बऱ्याच जणांना हॉटेल आणि मोठ्या रेस्टॉरंट मध्ये चिकन कंटकी खायला भरपूर प्रमाणात आवडते पण त्यांना आपण सेम हॉटेल आणि मोठ्या रेस्टॉरंट सारखी बनवल्या जाणारी चिकन कंटकी ते आपण घरी देखील कशी बनवू शकतो अशी त्यांची खात्री पटत नाही तर मग आज मित्रांनो माझ्या या ब्लॉगिंग मध्ये मी तुम्हाला अगदी चमचमीत लागणारी चिकन कंटकी ती कशी घरी बनवायची इथे आज दाखवणार आहे.


चिकन कंटकी बनवायची सामग्री:-

 1.एक वाटी लसणाच्या पाकळ्या.

 2.अर्धा किलो चिकन.

 3.एक वाटी अद्रक चे तुकडे.

 4.चवीनुसार मीठ.

 5.चिकन कंटकी मसाला.

 6.पुरेसं तेल.

 7.एक वाटी चिरलेली पत्ता गोबी.

 8.एक लिंबू.

 9.खायचा केशरी रंग.

10.एक चमचा हळद.


चिकन कंटकी बनवायची प्रक्रिया:-


चिकन केंटकी – कुरकुरीत रेसिपी  आणि घरचं आनंद | Hot and crispy Chicken Recipe



1. सर्वप्रथम आपण इथे चिकन दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घेणार आहोत. चिकनला स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्या मधला वास हा निघून जातो म्हणून चिकन हे दोन ते तीन चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे आहे.


2. तसेच चिकन स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घेतल्या नंतर आपण अद्रक आणि लसणाची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. अद्रक आणि लसणाची बारीक चांगल्या प्रकारे पेस्ट झाल्यानंतर आपण लगेच धुतलेल्या चिकन मध्ये ती पेस्ट ऍड करून घेणार आहोत. तसेच पेस्ट ऍड केल्यानंतर त्यामध्ये हळद एक चमचा टाकायची आहे.


3. तसेच त्यानंतर त्या चिकन मध्ये चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत. आणि हे सगळं घातल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे आपल्या दोन्ही हाताने एकजीव करून घ्यायचे आहे. आणि तसे एक लिंबू कट करून त्यामध्ये तो लिंबू पिळायचा आहे. जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही त्यामध्ये तीन चमचे दही देखील घालून त्याला एकजीव करून घेऊ शकतात.


4. तसेच त्यामध्ये लिंबू पिळल्यानंतर त्याला पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचे आहे. तसेच त्यानंतर आपला जो खायाचा केशरी रंग आहे तो आपण इथे वापरणार आहोत तसेच त्या चिकनच्या बॅटरमध्ये एक चमचा खायचा रंग टाकायचा आहे. तसेच त्यानंतर खायचा रंग टाकल्यावर पुन्हा एकदा या सगळ्याला एकजीव करून घ्यायचे आहे.


5. तसेच हे एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मार्केटमध्ये मिळवणारा किंवा बाजारामध्ये उपलब्ध असणारा चिकन कंटकी मसाला  त्यामध्ये टाकणार आहे चिकन कंटकी मसाला अर्धा किलो चिकन ला पूर्ण एक पाकीट टाकायचे आहे. म्हणजेच तो मसाला पूर्णपणे चिकनच्या बॅटरला लागल्या जातो. आणि चिकन कंटकी ही चमचमीत बनते म्हणून चिकन कंटकी मसाला पूर्ण एक पाकीट त्यामध्ये टाकायचे आहे.


6. तसेच  एक पाकीट टाकल्यानंतर त्या सगळ्या चिकनच्या बॅटरला चांगल्या प्रकारे आपल्या दोन्ही हाताने एकजीव करून घ्यायचे आहे. म्हणजे चिकन मसाला हा चिकनच्या प्रत्येक तुकड्याला चांगल्या प्रकारे लागला पाहिजे. चिकन कंटकी मसाला हा चांगल्या प्रकारे चिकनला लावल्यानंतर त्याला आपल्याला फ्रीज म्हणजे मॅग्नेट टाईप घट्ट होऊन देण्यासाठी फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवायचे आहे.


7. म्हणजेच ते चांगल्या प्रकारे फ्रिजमध्ये चिकनचे बॅटर हे घट्ट झाले की ते तळायला सोपे जाते म्हणून त्याला फ्रीजमध्ये फ्रीज करायचे आहे. तसेच अर्धा तास चिकन ला फ्रिज केल्यानंतर आपण त्याला बाहेर काढून घ्यायचे आहे. तसेच त्याला बाहेर काढल्यानंतर आपण लगेचच एक कढई किंवा मोठा पॅन घ्यायचा आहे.


8. तसेच त्यानंतर लगेचच मोठी कढई घेतल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचे आहे. चिकन कंटकी तळण्यापुरते पुरेसे तेल कढईमध्ये घ्यायचे आहे तसेच तेल घेतल्यानंतर ते चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचे आहे तसेच तेल गरम झाल्यानंतर गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे. जर हा गॅस जास्त हाय फ्लेमवर ठेवल्यास चिकन तळताना चिकनचे पिसेस हे आपल्या तोंडावर उडायची शक्यता असते. म्हणून गॅस हा मंद आचेवर ठेवूनच तळायचे आहे.


9. तसेच तेल गरम झाल्यानंतर एक एक पीस किंवा दोन दोन चिकनचे पीसेस तेलामध्ये सोडायचे आहे आणि ते चांगल्या  ब्राऊन रंगाचे झाल्यास त्याला बाहेर काढायचे आहे. पण आपण त्याला चिकन कंटकी मसाला लावल्यामुळे त्याचा रंग हा लालच असतो म्हणून तो बऱ्याच लोकांनाचिकन पिसेस तळताना समजत नाही म्हणून त्याला चांगल्या प्रकारे ब्राऊन रंगाचा होऊ द्यायचे आहे. चिकनचे पीस तळताना जरा थोडेसे कढईपासून दूर राहूनच तळायचे आहे. कारण तेलही तोंडावर उडायची शक्यता देखील असते.

10. तसेच चिकनचे पीसेस तळल्यानंतर त्याला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि कच्ची चिरलेली पत्ता गोबी यासोबत खायचे आहे. तसेच माझी आजच्या ब्लॉगिंग मध्ये चिकन कंटकी रेसिपी इन मराठी तयार आहे तर तुम्ही देखील लवकरच या चमचमीत चिकन कंटकी रेसिपीला लवकरच बनवावे. आणि माझी खात्रीपूर्वक जाणीव देखील आहे की तुम्हाला चिकन


कंटकी रेसिपी आवडली असेलच.

 

विशेष टीप:-

1. चिकन कंटकीला तुम्ही शेजवान चटणी किंवा घरी असलेला टोमॅटो केचप यासोबत देखील खाऊ शकतात.


2. तसेच चिकन कंटकीला तुम्ही पोळी सोबत देखील खाऊ शकतात.


3. तसेच चिकन कंटकी बनवताना त्यामध्ये लिंबू किंवा दही या दोघांमधला एक तरी गोष्टीचा चिकन कंटकी बनवताना समावेश हवा.


4. तसेच चिकन कंटकी बनवताना गॅस हा मंद आचेवरच हवा नाहीतर गॅस मंद आचेवर नसल्यावर तेल उडायची शक्यता असते. म्हणून चिकन कंटकी बनवताना गॅस हा मंद आचेवरच हवा


5. तसेच चिकनचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावा कारण यामध्ये प्रोटीन हे भरपूर प्रमाणात असते.


6. तसेच चिकन कंटकी बनवल्यानंतर गार्निश साठी किंवा त्याला सुंदर दिसण्यासाठी कोथंबीर बारीक चिरून टाकावी.


7. तसेच चिकन कंटकी फ्राय करताना त्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे मंद आचेवर आणि डीप फ्राय करावे म्हणजेच चिकन  कंटकी ही खायला आणि दिसायला देखील कुरकुरीत बनते.


8. चिकन कंटकी बनवताना मसाल्या मध्ये म्हणजे सगळं एकजीव करताना त्यामध्ये थोडे चिमूटभर धने देखील टाकले तर चिकन कंटकी ही अत्यंत चवदार बनते पण चिकन कंटकी मध्ये धनेहे ॲड करणे ऑप्शनल आहे.


9. तसेच चिकन कंटकी बनवल्या नंतर ती गरम गरम खाण्यातच मजा आहे थंड झाल्यावर चिकन कंटकी नरम होऊन जाते आणि त्याचा आस्वाद आपल्याला घेता येत नाही. म्हणून चिकन कंटकी बनवल्या नंतर ती गरम गरमच खायला हवी.

 

 

तसेच तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !

 

Created by :- Flavors by Akruti – A Culinary Journey  through Taste and Tradition.

0 Comments