खास मराठी अंदाजातील चिकन बिर्यानी रेसिपी
बिर्याणी म्हणलं तर सगळ्यांचे तोंडाला पाणी सुटते. बिर्याणी हा प्रामुख्याने भारतामध्ये बनवला जाणारा लोकप्रियखाद्यपदार्थ आहे. बिर्याणी हा खाद्यपदार्थ मटन अथवा चिकन वापरून बनवला जाणारा पदार्थ आहे. तसेच मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा बिर्याणीला जास्त पसंती असते. तसेच बाहेर बाजारात मोठे मोठे हॉटेल्स मध्ये बिर्याणीची विक्री केले जाते. मटन च्या भाज्यांमधून, तसेच चिकनच्या भाज्या बनवायचा कंटाळा आल्यास घरोघरी बिर्याणी हा खाद्यपदार्थ बनवला जातो. मटन चिकन च्या भाज्यांपेक्षा अगदी बिर्याणी ही चवदार असते.
मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकत्ता अशा मोठ्या मोठ्या शहरात बिर्याणी या खाद्यपदार्थाचा खाण्यामध्ये समावेश असतो आणि लोक सुद्धा बिर्याणी या खाद्यपदार्थाचा उपभोग घेतात. तर तसेच आज मित्रांनो आपण चिकन बिर्याणी ही अगदी बाहेर मिळणाऱ्या हॉटेल सारखी अगदी चवदार आणि उत्तम प्रकारे ते पण .घरगुती पद्धतीने ही कशी बनवायची ते आपण येथे पाहणार आहोत. रोजच्या दगदगीच्या दैनंदिन जीवनात लोकांना बाहेर हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणीचा आस्वाद घेता येत नाही म्हणूनच घरगुती पद्धतीने चिकन बिर्याणी कशी बनवायची ते आपण इथे बघणार आहोत.
चिकन बिर्याणी बनवाय साठी लागणारी सामग्री-
1. एक किलो चिकन.
2. एक किलो बासमती तांदूळ.
3. दहा ते बारा कांदे.
4. चार ते पाच टमाटे.
5. दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या.
6. एक गड्डी कोथिंबीर.
7. एक गड्डी पुदिना.
8. एक वाटी लसणाच्या पाकळ्या.
9. दोन तुकडे अद्रक.
10. पुरेसं तेल.
11. चिकन बिर्याणी मसाला.
12. चवीनुसार मीठ.
13. चिकन मसाला.
14. दोन छोटे चमचे गरम मसाला.
15. एक छोटा चमचा हळद.
16. दोन ते तीन इलायची.
17. एक वाटी दही.
18. एक छोटा चमचा हळद.
19. खायचा रंग.
चिकन बिर्याणी बनवायची प्रक्रिया-
1. सर्वप्रथम आपण चिकन हे स्वच्छ धुऊन घेणार आहोत. चिकन हे दोन पाण्यातदोन वेळेस
स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर एक भांडे घेऊन त्यामध्ये दोन छोटे चमचे तेल टाकायचे
आहे तेल गरम झाल्यास त्यामध्ये एक बारीक कांदा कट करून टाकायचा आहे. बारीक कांदा यामुळे
टाकायचा आहे कारण चिकन शिजवताना व शिजून झाल्यास त्यामधून वास येत नाही. तसेच कांदा
चिरून टाकल्यावर कांदा पूर्णपणे तपकिरी रंग झाल्यास त्यामध्ये एक चमचा छोटा हळद टाकायची
आहे.
2. हळद टाकल्यानंतर दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे तसेच त्यानंतर स्वच्छ
धुतलेली चिकन त्यामध्ये टाकायचे आहे तसेच एका चमच्याने त्याला पूर्णपणे एकजीव करायचे
आहे तसेच त्यावरती झाकण ठेवायचे आहे. तसेच त्यानंतर चिकनला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचे
आहे.
3. तसेच त्यानंतर चिकन शिजताना चिकन मसाला त्यामध्ये आपण टाकणार आहोत. परत त्याला
पूर्णपणे चमच्याने एकजीव करून घेणार आहोत. तसेच त्यानंतर चिकन पूर्णपणे शिजल्यावर गॅस
बंद करायचा आहे पण मात्र चिकन हे मंद आचेवर होऊ द्यायचे आहे. चांगल्या प्रकारे शिजल्या
जाते. त्याला चव ही येते.
4. तसेच त्यानंतर चिकन शिजल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे. मग त्यानंतर एक बिर्याणी
बनवण्यासाठी मोठे पातेले किंवा भांडे घ्यायचा आहे. तसेच त्यानंतर त्या भांड्यामध्ये
दोन मोठे चमचे तेल घ्यायचे आहे ते घेतल्यानंतर थोडं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यास
तेलामध्ये उभे चिरलेले कांदे सोडायचे आहेत तसेच कांदे सोडल्यावर कांदा हा मस्त ब्राऊन
आणि तपकिरी रंगाचा होऊ द्यायचा आहे. म्हणजेच बिर्याणी ही चवदार होते.
5. तसेच त्यानंतर कांदा पूर्णपणे ब्राऊन झाल्यास त्यामध्ये टमाटे चिरून टाकायचे
आहेत तसेच टमाट्याला पण पाच ते सात मिनिटं चांगल्या प्रकारे फ्राय करायचे आहे. चांगल्या
प्रकारे फ्राय झाल्यास त्यामध्ये उभ्या हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहेत बिर्याणी
खाताना त्या दाताखाली येत नाही बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या दाताखाली येतात म्हणून
हिरव्या मिरच्या उभ्या कट करून टाकायच्या आहेत.
6. तसेच त्यानंतर हिरव्या मिरच्या पाच ते सात मिनिटं फ्राय झाल्यास त्यामध्ये इलायची
ठेचून टाकायची आहे म्हणजेच बिर्याणी शिजताना बिर्याणीला छान असा सुगंध येतो. तसेच त्यानंतर
अद्रक लसणाची पेस्ट दोन चमचे टाकायची आहे परत त्याला दोन ते तीन मिनिटे हे सगळ्याला
चमच्याने एकजीव करून घ्यायचे आहे. तसेच मग त्यानंतर पुदिना स्वच्छ धुऊन पुदिना टाकायचा
आहे पुदिना टाकल्यावर पुदिनाला त्यामध्ये मस्त सुगंध येईपर्यंत फ्राय करायचे आहे. तसेच
पुदिना फ्राय झाल्यावर त्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला टाकायचा आहे परत सगळ्याला हलक्या
हाताने एकजीव करायचे आहे.
7. पूर्णपणे एकजीव झाल्यास त्यामध्ये एक वाटी दही टाकायचे आहे दही नसल्यास तुम्ही
एक लिंबू पिळून टाकू शकता. तसेच दही टाकल्यानंतर परत थोडेसे हलक्या हाताने सगळे एकजीव
करायचा आहे मग त्यानंतर बासमती तांदूळ स्वच्छ धुवून बास मती तांदळाला त्या भांड्यामध्ये
टाकायचे आहे. तांदळाला टाकल्यानंतर परत हलक्या हलक्या हाताने त्याला पूर्णपणे एकजीव
करून घ्यायचे आहे तांदूळ टाकल्यानंतर एकजीव करताना हलक्या हातानेच करायचे आहे कारण
बासमती तांदूळ हे लंबे असतात हे तुटता कामा नये म्हणून हलक्या हाताने एकजीव करायचे
आहे. तसेच एकजीव झाल्यास त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे.
8. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर शिजवलेले चिकन त्यामध्ये सोडायचे आहे परत हलक्या हाताने
त्याला एकजीव करायचे आहे एकजीव केल्यानंतर
त्यानंतर बिर्याणी शिजण्यासाठी त्यामध्ये पुरेसे पाणी घालायचे आहे म्हणजेच बिर्याणी
शिजेल इतपत पाणी घालायचे आहे जास्तही पाणी टाकता कामा नये कारण बिर्याणी ही चिकट होऊ
शकते. तसेच पाणी घेतल्यास त्याला मंद आचेवर एक मोठे झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं शिजू
द्यायचे आहे. तसेच 15 ते 20 मिनिटे शिजवून झाल्यास त्यामध्ये हिरवी कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक चिरून वरतून स्प्रिंकल
करून घ्यायचे आहे. तसेच त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर बिर्याणीला शिजू द्यायचे
आहे. बिर्याणी ही सारखी सारखी झाकण उघडून चेक करायची आहे शिजली की नाही हे बघत राहायचे
आहे. जास्त वेळ बिर्याणी शिजवल्यास ती खाली भांड्याला चिटकली जाते. व बिर्याणी जळायची
शक्यता असते त्यामुळे मंद आचेवर बिर्याणी होऊ देता देता थोडा थोडा वेळ त्याला चेक करायचे
आहे .
9. तसेच बिर्याणी शिजत आल्यावर त्यामध्ये खायचा रंग म्हणजेच केशरी किंवा हिरवा
तो टाकायचा आहे रंग टाकताना तो एका छोट्या वाटीमध्ये दोन छोटे चमचे पाणी घ्यायचे आहे
पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये रंग टाकून त्याचं मिश्रण करायचं आहे पाण्याचा आणि रंगाचं
पूर्णपणे मिश्रण झाल्यास ते बिर्याणी मध्ये टाकायचे आहे म्हणजेच बिर्याणी आणखी देखील
छान दिसते. बिर्याणी झाल्यास त्याला बंद करून घ्यायचे आहे. आणि थोडा वेळ झाकण तसेच
ठेवायचे आहे बिर्याणी वरचे झाकण काढल्यास जे तांदूळ थोडेसे शिजायचे राहिलेले असतात
ते वाफेमध्ये शिजल्या जातात त्यामुळे झाकण हे तसेच राहू द्यायचे आहेत. मित्रांनो बिर्याणी
ही तयार आहे मग तुम्ही केव्हा बिर्याणी बनवत आहात. तर लवकरच ही रेसिपी बघा आणि तुमच्या
घरी देखील घरगुती पद्धतीने हॉटेल सारखी बिर्याणी बनवा.
तसेच तुमचं मनःपूर्वक धन्यवाद !
Created by Flavors by Akruti – A Culinary Journey through Taste and Tradition.
.webp)
.webp)
.webp)
.png)
.webp)
0 Comments