आलू पकोड़ा (आलू बज्जी) पावसाळी दिवसात सर्वोत्तम | Aloo Pakora | Aloo Bajji

आलू पकोड़ा (आलू बज्जी) पावसाळी दिवसात सर्वोत्तम


आलू पकोड़ा (आलू बज्जी) पावसाळी दिवसात सर्वोत्तम | Aloo Pakora | Aloo Bajji


    पावसाळा ऋतू आला की सर्वांना गरम गरम खाऊसं वाटतं कुणाला जलेबी फाफडा खाऊ वाटतो तर कुणाला समोसे खाऊ वाटतात तसेच कुणाकुणाला तर कचोडी आणि गरम गरम पापड देखील खाऊ वाटतं आणि बरेचसे लोक आहेत की त्यांना कांदा भजी खाऊ वाटतात पाऊस पडायला लागला की लगेचच घरामध्ये फर्माईश होते की काहीतरी गरम गरम बनवा काहीतरी गरम गरम बनवा म्हटलं की आपण लगेच बेसनाचे पदार्थ बनवायला घेतो

    बेसन पासून तळीव पदार्थ जो काही असेल आपण तो बनवतो मग
ती शेव असो किंवा बेसनाची पापडी असते आपण ती बनवतो तसेच कोणी कोणी उडदाच्या डाळीची भाजी आणि माझ्या मागील ब्लॉगिंग मध्ये मी तुम्हाला मुगाच्या डाळीची भजी ही रेसिपी दाखवली होती तसंच भजे जर खायचे म्हणले तर त्यासोबत अजून वेगवेगळ्या प्रकारचे भजे जुळल्या जातात ते म्हणजे पनीरची भाजी तसेच कांदा भजी आणि सर्वात जास्त आवडीने खाणारे म्हणजेच आलू भजी

    आलू भजी कशी बनवायची आणि ती कशी चवदार लागेल आणि त्यासोबत काय खायचं आहे तर आज मी इथे घेऊन आली आहे माझ्या या ब्लॉगिंग मध्ये आलू भजी इन रेसिपी चला तर मग मित्रांनो आज बघूया बटाटे भजी बनवली की त्यासोबत कशाचा आस्वाद घ्यायचा आणि त्या कशा टेस्टी लागते खायला तर आज आपण ते बघणार आहोत त्याच्या काही टिप्स आणि त्याची पद्धत म्हणजेच घरगुती पद्धत मी तुम्हाला येथे दाखवणार आहे चला तर मग बघूया बटाटी भजी.

आलू भजी बनवायची सामग्री-

1. दोन मोठे कप बेसन.

2. चार ते सात हिरव्या मिरच्या.

3. एक वाटी चिरलेली कोथिंबीर.

4. दोन चमचे हळद.

5. चार चमचे लाल तिखट.

6. चवीनुसार मीठ.

7. चिमूटभर सोडा.

8. पुरेसं तेल.

9. चार मोठे बटाटे.

बटाटे भजे बनवायची प्रक्रिया-

    1. सर्वप्रथम आपण मित्रांनो चांगल्या प्रकारे बटाटे हे स्वच्छ धुऊन आणि त्याचे वरील सालटे काढून त्याला सोलून घेणार आहोत तसेच बटाट्याचे वरून सालटे काढून झाले की परत त्याला एकदा पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घेणार आहोत तसेच पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जी किसणी असते त्या किसणीने त्याचे छोटे छोटे चकत्या म्हणजे चिप्स करायचे आहेत एका बटाट्याचे जास्त होतात चिप्स चिप्सचा लेयर हा खूप पातळ असला पाहिजे कारण जेव्हा ती बनेल तेव्हा ते खूप खमंग आणि चवदार लागतो. जाड भाग बटाट्यांचा नकोय म्हणून एकदम पातळ पातळ त्याच्या चकत्या म्हणजे चिप्स बनवून घ्यायचे आहे.

    2. तसेच बटाट्याचे चिप्स बनवून घेतल्यानंतर ते एका भांड्यात पाण्यामध्ये ठेवायचे आहे आणि तसेच ठेवल्यानंतर दोन कांदे घेऊन त्याला स्वच्छ सोलून त्याला बारीक चिरून घेणार आहोत तसेच बारीक कांदा चिरल्यानंतर ते एका भांड्यामध्ये ठेवायचे आहे तसेच भांड्यामध्ये ठेवल्यानंतर हिरव्या मिरच्या मिक्सर मधून काढून हिरव्या मिरचीची पेस्ट ही देखील त्या कांद्यामध्ये ऍड करायची आहे तसेच ते पेस्ट केल्यानंतर त्यासोबत हळद आणि लाल तिखट ॲड करायचा आहे तसेच सोबत चवीनुसार मीठ आणि बटाट्याच्या चकत्या म्हणजे चिप्स त्यात ॲड करायचे आहे.

    3. तसेच बटाट्याचे चिप्स ॲड केल्यानंतर त्यामध्ये बेसन देखील ऍड करायचा आहे बेसन ऍड केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर सोडा ॲड करायचा आहे चिमूटभर सोडा ॲड केल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुऊन ती देखील वरतून टाकायची आहे आणि हे टाकल्यानंतर हे सर्व हाताने एकजीव करून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे हाताने एकजीव झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटे त्याला झाकण ठेवून तसेच ठेवून द्यायचे आहे.

    4. तसेच एक मोठी कढई घ्यायची आहे कढई घेतल्यानंतर ती गॅस वरती मंद आचेवर गरम करायला ठेवायची आहे तसेच गरम ठेवायला केल्यानंतर त्यामध्ये तेल घ्यायचं आहे तेल हे तळल्या जाईल इतपत घ्यायचा आहे तेल घेतल्यानंतर तेलाला एक दोन ते तीन मिनिटे गरम होऊ द्यायचे आहे तसेच तेल गरम झाल्यानंतर आपण जे बटाटे भज्याचं बॅटर बनवलेला आहे त्याचे झाकण खोलून चमच्याने किंवा हाताने घेऊन कढईमध्ये ते थोडे थोडे करून सोडायचे आहे.

    5. तसेच त्यानंतर आपण भजे त्यामध्ये सोडल्यावर ते कढईमध्ये चांगल्या प्रकारे ब्राऊन किंवा तपकिरी रंगाची म्हणजेच गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत त्याला फ्राय करत राहायचं आहे भजे तळताना खूप खमंग वास येतो तसेच गॅस हा मंद आचेवरच असायला हवा कारण गॅस हा जास्त आचेवर असला तर भजे हे जळू शकतात आणि जळल्यावर ते आपल्याला खायला चवदार लागणार नाहीत म्हणून गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे तसेच ब्राऊन रंगाचे ते झाल्यावर त्याला बाहेर काढायचा आहे एका प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये त्याला ठेवायचे आहे जर गार्निशिंगसाठी तुम्हाला त्यामध्ये काही टाकायचे असेल तर वरतून तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रिंकल करू शकतात तसेच त्यासोबत तुम्ही सॉस सुद्धा खाऊ शकतात तर मित्रांनो इथे आपले बटाटे भजे पावसाळा ऋतूतले ते सुद्धा अगदी खमंग आणि चवदार हे तयार आहेत तुम्ही देखील पावसाळ्याच्या ऋतूमध्ये खमंग बटाटे भजे लवकरात लवकर बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या कांद्या भजी पेक्षा बटाटे भजी ही खूप चवदार लागते कारण मी कालच ही रेसिपी घरी केली तेव्हा मला त्या भजी मधला खायचा फरक जाणवला आणि ते कितपत चवदार लागते ते सुद्धा मला जाणवले तुम्ही देखील नक्कीच बटाटे भजी बनवून बघा.


विशेष टीप-

    1. बटाटे भजी बनवताना भज्यांचे बेटर आहे त्यामध्ये जर तुम्हाला ओवा देखील चिमुटभर ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकतात पण जर सोडा जर नसेल तर त्यास मध्ये तुम्ही ओवा ॲड करू शकतात.

    2. बटाटे भजे बनवताना त्याचे बेटर हे जास्त पातळ झालं नाही पाहिजे ते थोडंसं घट्ट म्हणजेच मिडीयम असायला हवं जर जास्त पातळ असलं तर जेव्हा आपण तळताना कढईमध्ये भजे सोडतो तेव्हा ते कढईला खाली चिटकतात आणि भजे हे फुटायची शक्यता असते त्यामुळे बॅटर हे थोडं घट्ट झालं पाहिजे.

    3. तसेच भजी बनवताना मी त्यामध्ये लाल तिखट मिरची ऍड केलेली आहे लाल तिखट मिरचीने भजी अजून चवदार होतात जर तुमच्या आवडीने तुम्हाला जर हिरव्या मिरच्या त्यामध्ये ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकतात तसेच भजे बनवताना बरेच लोक लसणाची देखील पेस्ट बनवून त्यामध्ये ऍड करतात जर तुम्हाला लसणाची पेस्ट ऍड करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकतात पण मी माझ्या रेसिपी मध्ये लसूण ऍड केलेला नाहीये तरी देखील बटाटे भजी अत्यंत चवदार झाली आहेत.

    4. तसेच आलू भजी बनवताना त्यामध्ये चिमूटभर सोडा ॲड करायचा आहे जास्त सोडा जरा ॲड केला तर ते जास्त फुगतात आणि पूर्ण तेल शोषून घेतात आणि बटाटे भजे हे चवदार बनणार नाहीत म्हणून सोडा जास्त ऍड करायचा नाहीये कारण बऱ्याच जणांना सोडा याचा अंदाज कळत नाही आणि ते जास्त त्याच्यामध्ये ॲड करतात. तर ती मात्र गोष्ट टाळायची आहे.

    5. भजी तळताना कढई जवळ म्हणजेच गॅस जवळ जास्त जवळ थांबायचे नाही जास्त जवळ थांबून भजे तळले की ते तेल उडायची शक्यता असते आणि गॅस शक्यतो मंद आचेवरच ठेवायचा आहे हाय फ्लेमवर ठेवला तर तेल उडायची शक्यता असते.

    6. बटाटे भजी तुम्ही पोळीसोबत देखील खाऊ शकतात जेवणासोबत देखील खाऊ शकतात तसेच बटाटी भजी जे आपले दही असतं त्यासोबत तर अगदी चवदार लागतं किंवा घरातील ज्या हिरव्या मिरच्या असतात त्याला उभ्या चिरून त्यामध्ये मीठ भरून त्या तेलात फ्राय करून त्यासोबत देखील तुम्ही बटाटे भजे खाऊ शकतात आणि बटाटे भजी जेवढी गरम गरम खाल्ली तेवढी ती चवदार आणि छान लागतात तसे थंड झाल्यावर पण छान लागतातच पण गरम जास्त छान लागते.

 

तसेच तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !


 
Created by:-  Flavors by Akruti – A Culinary Journey Through Taste and Tradition.

0 Comments