आलू पराठा रेसिपी: स्वादिष्ट आलू पराठ्यांची विशेष रेसिपी
आता रोजच्या दैनंदिन जीवनात माझी पोळी खायचा कंटाळा आला की आपण पराठे करतो किंवा
धपाटे बनवून खातो मग ते वेगवेगळ्या पद्धतीचे असते तरी आपण ते आवर्जून लोणच्याने किंवा
दही सोबत याला खातो तसेच लहान मुलांना सुद्धा भाजी पोळी पेक्षा जास्त पराठे किंवा धपाटे
हे अत्यंत आवडतात आणि ते आवर्जून देखील खातात आणि त्याच पराठे सोबत जर तूप असलं तर
खायची मजा ही वेगळीच असते.
थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात आलूचा पराठा सोबत त्यावरून बटर किंवा तूप आणि सोबत
दही असले तर खाण्याची काही मजाच वेगळी असते तसेच उन्हाळ्यात देखील बटाटे पासून बनणारा
तो रुचकर आणि चमचमीत आलू पराठा खायची माझ्याच वेगळी असते.
कधी आपण त्याला तिखट देखील केलं आणि कधी आपण त्याला थंड असल्यावर सुद्धा खाल्लं
तर त्या पराठा ची चव ही वेगळीच असते जी कुठल्याच पराठ्याला येत नाही पंजाब मध्ये आलूचा
पराठा हा सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे प्रत्येकाच्या घरोघरी आणि त्यांच्या दैनंदिन
जीवनात एक टाइम का असेल तरीसुद्धा आलूचा पराठा हा बनवला जातो आणि त्याला मोठ्या आनंदाने
आवर्जून खाल्ल्या जातं
तर मित्रांनो माझ्या मागील ब्लॉगिंग मध्ये मी दुधी भोपळ्याचे पराठे तुम्हाला दाखवले
होते बऱ्याच लोकांना ते आवडले आणि बऱ्याच लोकांना ते आवडले सुद्धा नाही पण मी तुम्हाला
माझ्या या आजच्या न्यू ब्लॉगिंग मध्ये आलूचा पराठा हा कसा बनवायचा अगदी रुचकर चमचमीत
आणि चवदार हे तुम्हाला मी इथे आज दाखवणार आहे आणि मला पूर्णपणे खात्रीपूर्वक जाणीव
आहे की तू मला आलूचा पराठा हा नक्कीच देखील आवडेल चला तर मित्रांनो मग बघूया आजची एक
न्यू रेसिपी आलू पराठा रेसिपी इन मराठी.
आलू पराठा बनवायची सामग्री:-
1. अर्धा किलो बटाटे.
2. एक चमचा हळद.
3. तीन चमचे लाल तिखट.
4. पुरेसं तेल.
5. चवीनुसार मीठ.
6. चार ते पाच हिरव्या मिरच्या.
7. एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
8. पुरेसं पाणी.
9. दोन चमचे गरम मसाला.
आलू पराठा बनवण्याची प्रक्रिया:-
1. सर्वप्रथम आपण बटाटे स्वच्छ धुऊन त्याला उकडून घेणार आहोत तसेच उकडून घेतल्यानंतर
चांगल्या प्रकारे त्याला बटाट्याला थंड होऊ द्यायचे आहे बटाटे थंड झाले की बटाटे वरचे
जे साल आहे ते आपण काढून टाकणार आहोत आणि एक पातेले घ्यायचे आहे तसेच पातीला घेतल्यानंतर
त्यामध्ये बटाट्याचा कुस्करा करायचा आहे.
2. तसेच बटाट्याचा कुस्करा केल्यानंतर आपण त्यामध्ये काही मसाले ऍड करणार आहोत ते म्हणजेच दोन चमचे गरम मसाला तसेच एक चमचा हळद आणि चवीनुसार हवे तितके लाल तिखट तसेच त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची ही मिक्सर मधून वाटून त्या बटाट्याच्या बॅटरमध्ये ॲड करणार आहोत तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील आपण ऍड करणार आहोत.
3. तसेच ॲड केल्यानंतर त्यामध्ये एक लिंबू पिळून टाकायचा आहे लिंबू पिळून टाकताना
त्यामधले बिया बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुऊन त्यामध्ये
ऍड करायचे आहे तसेच ॲड केल्यानंतर परत एकदा हलक्या हाताने त्याला हलवून घ्यायचे आहे
म्हणजेच त्यामध्ये पूर्ण जो काही स्वाद असेल तो मिसळून जाईल आणि आपल्या आलू पराठ्याला
चव येईल.
4. तसेच त्यानंतर आपण गव्हाचं पिठाचं कणिक मळून घेणार आहोत कणिक हे जास्त पातळ
देखील मळायचं नाहीये ते मिडीयमच मऊ होईपर्यंत कणके मळून घ्यायचा आहे तसेच मळून घेतल्यानंतर
त्याला थोडंसं तेल लावून अजून एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे तसेच मळून घेतल्यानंतर
त्याला एक दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवायचे आहे.
5. तसेच त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतर गॅस वरती पॅन किंवा तवा घ्यायचा
आहे तसेच ते घेतल्यानंतर गॅसवर मंद आचेवर ठेवायचे आहे ठेवल्यानंतर आपण जे मळून घेतलेलं
कणिक आहे त्याचा एक एक करून पेढे एवढे किंवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवून ठेवून घ्यायचे
आहेत तसेच त्यामधला एक गोळा घेऊन थोडसं त्याला लाटून घ्यायचे आहे गोळा हा सहा इंच चा
गोलाकार आकाराचे पोळीही लाटायची आहे आणि त्यामध्ये बटाट्याचे बनवलेले बेटर दोन चमचे
घालायचे आहे.
6. तसेच ते घातल्यानंतर जसे मोदक किंवा पुरणपोळी बनवताना त्याला आपण बंद करतो त्याच
प्रकारे त्या पोळीला देखील बंद करून घ्यायचे आहे आणि बंद केल्यानंतर आपण ज्या गोळ्या
मध्ये बटाट्याचे बॅटर भरला आहे तो सुक्या पिठात बुडवून घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतर
त्याला पोळपाटावर ठेवून चांगल्या प्रकारे बेलन्याने हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे.
7. आलू पराठा हा लाटताना त्याला हलक्या हाताने लाटायचे आहे जास्त जोर लावला तर
तो फुटायची शक्यता असते म्हणून आलू पराठा हलक्या हाताने लावून घ्यायचा आहे आणि तव्यावरती
टाकायचा आहे तसेच तव्यावरती टाकल्यानंतर दोन्ही बाजूंनी तूप सोडून घ्यायचे आहे आणि
तो चांगल्या प्रकारे फुगायला लागला की त्याला पलटून घ्यायचे आहे आणि तसेच त्याला खरपूस
ब्राऊन रंगाची आणि तपकिरी रंगाचे होईपर्यंत चांगल्या प्रकारे मंद आचेवर त्याला फ्राय
करून घ्यायचे आहे.
8. तसेच आलूच्या पराठ्याला दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचे आहे आणि त्याला बाहेर
प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहे तसेच काढून घेतल्यानंतर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही
त्यावरतून बटर देखील ॲड करू शकतात आणि इथे आपला आलू पराठा हा रेडी आहे त्याचा तुम्ही
चांगल्या प्रकारे लोणचं किंवा दही या सोबत आस्वाद घेऊ शकतात चला तर मग तुम्ही देखील
लवकरात लवकर आलू पराठा रेसिपी इन मराठी बनवा आणि नक्कीच त्याचा आस्वाद घ्या.
विशेष टीप:-
1. आलू पराठा बनवताना लाटताना तो हलक्या हाताने लाटायचा आहे जर तो जास्त जोराने
लाटला तर आलू पराठा फुटायची शक्यता असते आणि तो चव देखील लागत नाही त्यामुळे तो हलक्या
हाताने लाटायचा आहे.
2. तसेच त्यानंतर बटाट्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर दही किंवा हिरवी चटणी पुदिन्याची
यासोबत देखील तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकतात.
3. आलू पराठा बनवताना बटाटे हे जास्त गाळ नाही झाले पाहिजे म्हणजेच ते बॅटरमध्ये
म्हणजेच पोळी मध्ये ते भरता येत नाही आणि लाटता सुद्धा येत नाही त्यामुळे ते जास्त
शिजवायचे नाही याची आपण काळजी घ्यावी आणि तसेच आलू पराठा बनवताना गॅस हा मंद आचेवर
ठेवायचा आहे.
.webp)
.webp)

.webp)
0 Comments