दुधी-भोपळा पराठा: मराठीतील लोकप्रिय रेसिपी | Dudhi Bhopla Paratha Recipe In Marathi

दुधी-भोपळा पराठा: मराठीतील लोकप्रिय रेसिपी

दुधी-भोपळा पराठा: मराठीतील लोकप्रिय रेसिपी | Dudhi Bhopla Paratha Recipe In Marathi

    दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. दुधी भोपळ्यामध्ये फायबर्स आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते पण भोपळा हा बऱ्याच लहान मुलांना खायला आवडत नाही त्याची भाजी देखील त्यांना खायला आवडत नाही लहान काय मोठ्या व्यक्तींना सुद्धा भोपळा अजिबातच आवडत नाही भोपळ्यामध्ये विटामिन बी देखील भरपूर प्रमाणात असते आणि कॅल्शियम सुद्धा भोपळ्यामध्ये अतिशय असते. दुधी भोपळा हा फळभाजी आहे याला हिंदी मधून लौकी की सब्जी असं नाव आहे आणि इंग्लिश मध्ये बॉटल गार्ड नाव याचा आहे

    दुधी भोपळ्याने मूळव्याध च्या समस्या देखील कमी होतात आणि चेहरा देखील येणे म्हणजे त्वचा देखील दुधी भोपळ्याने छान आहे दुधी भोपळ्याची खीर देखील अतिशय सुंदर असते खूप खायला तसेच मित्रांनो दुधी भोपळा हा कमीच लोकांना आवडतो पण याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आणि चांगले आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे

    मी आज माझ्या या नवीन ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला हे जाणून देण्यासाठी दुधी भोपळ्याचा प्रकार म्हणजेच दुधी भोपळा पासून बनवल्या जाणारा दुधी भोपळा पराठे हा खाद्यपदार्थ तुमच्या समोर घेऊन आलेली आहे माझ्या घरामध्ये सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खाल्ले पण त्यांना दुधी भोपळा कधीच आवडत नव्हते पण जेव्हापासून मी दुधी भोपळा चे पराठे बनवले त्यांना ते देखील नक्कीच आवडायला लागले तसेच मित्रांनो तुम्हाला देखील हे दुधी भोपळ्याचे पराठे आणि आजची रेसिपी ही नक्कीच आवडेल चला तर मग बघूया दुधी भोपळा पराठे रेसिपी इन मराठी आणि जाणून घेऊया त्याच्या टिप्स आणि त्याची पद्धत.

दुधी भोपळा पराठे बनवायची सामग्री:-

 1. अर्धा किलो दुधी भोपळा.

 2. दोन ते सात हिरव्या मिरच्या.

 3. चार ते आठ लसणाच्या पाकळ्या.

 4. दोन चमचे जिरे.

 5. चवीनुसार मीठ.

 6. एक चमचा हळद.

 7. दोन गाजर.

 8. चिमूटभर सोडा.

 9. दोन चमचे तीळ.

10. एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

11. पुरेसं तेल.

दुधी भोपळा पराठे बनवायची प्रक्रिया:-

दुधी-भोपळा पराठा: मराठीतील लोकप्रिय रेसिपी | Dudhi Bhopla Paratha Recipe In Marathi

    1. सर्वप्रथम आपण येथे हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेणार आहोत तसेच त्यानंतर लसणाच्या पाकळ्या देखील आपण इथे घेणार आहोत तसेच हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या तसेच त्यासोबत जिरे आणि थोडंसं मीठ हे सर्व आपण मिक्सर मधून याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत याची अगदी बारीक पेस्ट करायची आहे तसेच बारीक पेस्ट केल्यानंतर त्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे.

    2. तसेच त्यानंतर एक मोठी परात किंवा ताट आपण घेणार आहोत तसेच ते घेतल्यानंतर भोपळा हा स्वच्छ धुऊन त्याला किसणीने किसून घ्यायचे आहे त्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये तसेच भोपळा चांगल्या प्रकारे किसल्यानंतर सोबतच गाजर स्वच्छ धुऊन ते देखील किसणीने किसून घ्यायचे आहे.

दुधी-भोपळा पराठा: मराठीतील लोकप्रिय रेसिपी | Dudhi Bhopla Paratha Recipe In Marathi

    3. तसेच ते चांगल्या प्रकारे दोन्ही पण भोपळा आणि गाजर किसून घेतल्या नंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाची तसेच त्यासोबत जिरे हे सोबतची जी बनवलेली पेस्ट आहे ती त्यामध्ये ऍड करणार आहोत तसेच हे ऍड केल्यानंतर आपण त्यामध्ये गव्हाचे पीठ तीन कप ऍड करणार आहोत तसेच गव्हाचे पीठ ऍड केल्यानंतर दोन चमचे तीळ आणि एक चमचा हळद देखील ऍड करणार आहोत.

दुधी-भोपळा पराठा: मराठीतील लोकप्रिय रेसिपी | Dudhi Bhopla Paratha Recipe In Marathi

    4. तसेच हे सर्व ॲड केल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ऍड करणार आहोत कोथिंबीर ऍड केल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील ऍड करणार आहोत तसेच मी तयार केल्यानंतर थोडासा चिमूटभर खायचा सोडा त्यामध्ये ऍड करणार आहोत आणि हे सर्व पाणी न टाकता एकजीव करून त्याला चांगल्या प्रकारे मळून घेणार आहोत तसेच चांगल्या प्रकारे मळल्यानंतर जास्त घट्ट आणि जास्त पातळ ही नाही मिडीयम मध्ये त्याला मळायचे आहे तसेच मळून झाले की पराठ्याचं कणिक ला थोडंसं तेल लावून परत एकदा हलक्या हाताने मळून घेणार आहोत.

दुधी-भोपळा पराठा: मराठीतील लोकप्रिय रेसिपी | Dudhi Bhopla Paratha Recipe In Marathi

    5. म्हणजेच पराठ्याच्या कणीकला तेल लावल की पराठे बनवताना ते खाली पोळपाटला लाटताना चिटकत नाही म्हणून चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचे आहे तसेच तेल लावल्यानंतर लगेचच गॅस वरती जो पोळ्यांचा तवा आहे तो तवा गॅसवर मंद आचेवर ठेवायचा आहे तसेच ठेवल्यानंतर जे आपण मिळालेले पराठ्याचे कणीक आहे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि गोळे तयार करून झाले की एक एक करून लाटायचे आहे.

    6. पराठे अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे जास्त जोर लावून लाटले की ते तुटू शकतात म्हणून ते चांगल्या प्रकारे हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे तसेच लाटल्यानंतर तव्यावर पराठा टाकायच्या आधी तव्यावरती दोन चमचे तेल सोडायचे आहे आणि पराठे त्यावर ठेवायचा आहे चांगल्या प्रकारे पराठा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत त्यावरती शेकत राहायचं आहे तसेच दोन्ही बाजूने पराठ्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे आणि गॅस देखील मंद आचेवर ठेवायचा आहे गॅस हा जास्त हाय फ्लेमवर ठेवला तर आपले पराठे जळायची शक्यता असते त्यामुळे गॅस हा कमी आचेवर ठेवून त्याला फ्राय करत राहायचे आहे.

दुधी-भोपळा पराठा: मराठीतील लोकप्रिय रेसिपी | Dudhi Bhopla Paratha Recipe In Marathi

    7. तसेच मित्रांनो इथे आपले दुधी भोपळ्याचे पराठे हे तयार आहे अत्यंत आरोग्याला फायदेशीर आणि चवीला देखील सुंदर लागणारे भोपळ्याचे पराठे हे तयार आहे चला तर तुम्ही देखील पटकन दुधी भोपळ्याची पराठे बनवून त्याचा आस्वाद घ्या आणि तुमच्या आरोग्याला देखील चांगला फायदा द्या दुधी भोपळ्याचे पराठे हे तुम्ही डब्याला देखील किंवा पिकनिकला जाताना शाळेत जाताना घेऊन जाऊ शकतात.

विशेष टीप:-

    1. दुधी भोपळा पराठे जर तुम्हाला जास्त तिखट लागत असतील तर तुम्ही जास्त हिरव्या मिरच्या देखील ऍड करून दुधी भोपळ्याचे पराठे मध्ये ते ऍड करून खाऊ शकतात.

    2. तसेच पराठे हे तुम्ही दही किंवा घरामध्ये अवेलेबल असणारा टोमॅटो सॉस केचप यासोबत देखील तुम्ही भोपळ्याच्या पराठ्याचा आस्वाद घेऊ शकतात.

    3. भोपळा हा किसल्यानंतर लगेचच त्याचे पराठे बनवायचे आहे म्हणजेच लगेच त्याला मळून घ्यायचा आहे जर तुम्ही त्याला बराच वेळ ठेवलं आणि त्याचे पराठे लाटले नाही तर भोपळा हा काळा पडायची शक्यता असते आणि त्याच्यातली व्हिटॅमिन देखील निघून जातात म्हणून ते पटकन बनवायचे आहे.

    4. तसेच जर तुमच्याकडे दही आणि टोमॅटो सॉस देखील खायला नसेल तर तुम्ही भोपळ्याचे पराठेही घरामध्ये असलेले लोणचं किंवा साजूक तूप यासोबत देखील भोपळ्याचा आस्वाद घेऊ शकतात भोपळ्याच्या पराठ्याने वजन देखील आटोक्यात राहते आणि भोपळा खाल्ल्याने आपले वजन वाढतही नाही आणि आपण फिट देखील तेवढेच राहतो.

    5. तसेच भोपळा हा थोडा ओलसर असल्यामुळे आणि गाजर देखील थोडं ओलसर असल्यामुळे जेव्हा तुम्ही त्याचे कणिक मळता तेव्हा पाणी न घालताच मळायचा आहे पाणी टाकलं तर ते पूर्ण पातळ व्हायची शक्यता असते आणि पराठे सुद्धा चांगले जमत नाही त्यामुळे त्यामध्ये पाणी ऍड करायचे नाही.

    6. भोपळ्याच्या पराठे बनवताना तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये कांदा लसूण ची जी चटणी असते म्हणजे जे लाल तिखट असते ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकतात तसेच भोपळ्याचे पराठे हे आपण जी कोशिंबीर काकडीची खातो त्यासोबत देखील अगदी छान लागतात कारण मी भोपळ्याच्या पराठ्यासोबत कोशिंबीर खाल्ली आहे तुम्ही देखील तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकतात.

    7. तसेच भोपळ्याच्या पराठे मध्ये आवर्जून एक गाजर तरी किसून टाकायचेच आहे म्हणजे त्याला कलर देखील छान येईल आणि ते चवीला देखील तितकेच छान लागेल त्यामुळे त्यामध्ये एक गाजर जरी आवर्जून टाकायचे आहे.

तसेच तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !

 
Created by:-  Flavors by Akruti – A Culinary Journey Through Taste and Tradition.

 

0 Comments