कोथिंबीर वडी रेसिपी - महाराष्ट्रीयन स्वादाचं नाश्ता, घरच्या किचनमध्ये
आता वड्या या निरनिराळ्या प्रकारच्या म्हणजे आळूवडी, खोबऱ्याची वडी, शेंगदाणा वडी अशा या निर्णया प्रकारच्या वड्या असतात
असेच डाळीच्या वडी पण कोथिंबीर वडी हे खूप कमी लोकांना माहिती आहे बरेच कमी लोक या
कोथंबीर वडीचा आस्वाद घेतात तसेच ज्या ज्या लोकांना कोथिंबीर वडी माहित आहे ते तर अगदी
आवर्जून आणि आवडीने ही कोथिंबीर वडी खातात कोथिंबीर वडी ही महाराष्ट्रातील अनेक खाद्यपदार्थ
सारखेच चवदार आणि लोकप्रिय आहे.
नैवेद्याला किंवा देवाच्या भोग देताना कोथिंबीर वडी ताटामध्ये ठेवली जाते तसेच
कोथिंबीर वडी हा तळीव पदार्थ आहे पण कोथिंबीर त्यात असल्यामुळे बरेच विटामिन्स आणि
कॅल्शियम आपल्याला भेटतात काही लोकांना सवय असते जेवण करताना बनवलेल्या भाज्यांमधून
कोथिंबीर बाजूला काढायची ते खात नाहीत परंतु कोथिंबीर पण इतर भाज्यांसारखा तोही देखील
एक घटकच आहे आपल्या आहारातला म्हणून कोथिंबिर ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कोथिंबीरने
चेहऱ्यावर देशी तेवढं चांगले राहते आणि बनवणारे भाज्यांमध्ये देखील कोथंबीर ला चांगली
चव येते.
तर मित्रांनो माझ्या मागील ब्लॉगिंग मध्ये मी तुम्हाला आळूवडी ही रेसिपी दाखवली
होती तसेच माझ्या या आजच्या या न्यू रेसिपी मध्ये मी कोथिंबीर वडी दाखवणार आहे मी कालच
कोथिंबीर वड्या घरी करून बघितल्या जेव्हा मी त्या घरी केल्या तेव्हा सर्वांना खूप आवडते
माझ्या घरी देखील कोथिंबीर वडी कोणाला जास्त माहित नाही पण जेव्हा मी त्याला बनवून
समोर नाही तेव्हा त्यांना आश्चर्यचकितच वाटलं कोथिंबीर वडी सुद्धा असतात आणि त्यांनी
टेस्ट केल्यावर तर त्यांना कोथिंबीर वडीची आणखी देखील चव लागली आणि सर्वांनाच कोथिंबीर
वड्या खूप आवडल्या.
आधी मला वाटायचं कोथिंबीर वडी ही खूप अवघड आहे पण जेव्हा मी करून बघितली तेव्हा
मला कळलं की हा तेवढा सोपा साधा खाद्यपदार्थ आहे आणि झटपट तयार होणारा हा एक तळीव खाद्यपदार्थ
आहे तर मित्रांनो चला तर मग बघूया माझ्या आजच्या ब्लॉगिंग मध्ये कोथिंबीर वडी रेसिपी
इन मराठी .
कोथिंबीर वडी बनवायची सामग्री:-
1. एक गड्डी कोथिंबीर.
2. दोन चमचे लाल तिखट.
3. एक चमचा हळद.
4. चार ते पाच हिरव्या मिरच्या.
5. चवीनुसार मीठ.
6. एक कप तांदळाचे पीठ.
7. दोन कप बेसन पीठ.
8. दोन ते चार लसणाच्या पाकळ्या.
9. पुरेसं तेल.
10. अर्धी वाटी तीळ.
कोथिंबीर वडी बनवायची प्रक्रिया:-
1. सर्वप्रथम आपण इथे मित्रांनो एक मोठी ताट घेणार आहोत ताट घेतल्यानंतर कोथिंबीर
छान निवडून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कुठलेच प्रकारचा कचरा नको आणि ती खराब देखील
नको तसेच कोथिंबीर चांगली निवडून घेतल्यानंतर तिला स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुऊन
घ्यायचे आहे म्हणजेच कोथिंबीर मधले जे काही माती घाण असेल ती निघून जाईल तसेच कोथिंबीर
छान प्रकारे धुतल्यानंतर तिला जेवढे जमेल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे.
2. कोथिंबीर ही अगदी बारीक चिरायची आहे कारण जर तुम्ही कोथिंबीर व्यवस्थित चिरले नाही
तर जेव्हा आपण वड्याच्या काम करतो म्हणजेच वडे कापतो तेव्हा त्या तुटायला लागतं जर
कोथंबीर नीट चरली नाही तर त्यामुळे कोथंबीर ही अगदी बारीक चिरून घ्यायची आहे तसेच कोथिंबीर
बारीक चिरल्यानंतर लगेचच त्यामध्ये बेसन ऍड करायचा आहे.
3. तसेच बेसन ऍड केल्यानंतर त्यामध्ये वरतून तांदळाचे पीठ ऍड करायचे आहे तांदळाचे
पीठ याच्यामुळे ऍड करायचे आहे की तांदळाचे पीठ ऍड केल्यानंतर कोथिंबीर वड्या खूप खुसखुशीत
आणि कुरकुरीत होतात त्यामुळे तांदळाचे पीठ ऍड करायचे आहे तांदळाचे पीठ जर घरी अवेलेबल
नसेल किंवा मार्केटमध्ये भेटलं नसेल तर घरात असलेले तांदूळ सुके तांदूळ हे चांगले निवडून
मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे.
4. तसेच तांदळाचे पीठ ऍड केल्यानंतर त्यामध्ये त्यावरून लाल तिखट आणि हळद ऍड करायची
तसेच हिरव्या मिरच्या आणि लसण याचे मिक्सर मधून चांगली पेस्ट करून ती सुद्धा याच्यात
ऍड करायचे आहे जर तुम्हाला जास्त कोथिंबीर वड्या तिखट लागत असतील तर तुम्ही जास्त लाल
तिखट किंवा हिरव्या मिरच्या ऍड करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट त्याला ठेवू
शकतात.
5. तसेच त्यानंतर त्यामध्ये आपण वरतून चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत तसेच मीठ ऍड केल्यानंतर
आपण चांगले प्रकारे त्याला हाताने एकजीव करून घेणार आहोत म्हणजे जसा आपण गव्हाचं कणिक
मळतो म्हणजे पीठ मळतो तसंच आपण याला चांगलं थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत पीठ
हे जास्त पातळही नाही मळायचं आणि जास्त घट्ट देखील मळायचं नाही ते अगदी मिडीयम मळायचं
आहे आणि पाणी थोडे थोडे घालून मळायच आहे.
6. कोथिंबीर च्या वड्याचं चांगलं कणिक मळून घेतल्यानंतर त्याचे लंबे लंबे म्हणजेच
लांब भागात गोळे तयार करून घ्यायचे आहे तसेच कोथिंबीरच्या वड्यांचे गोळे तयार झाल्यानंतर
आपण घरात उकडायची जाळी जी असते किंवा भांडे ते घेणार आहोत ते घेतल्यानंतर आपण गॅस वरती
एक दुसरे भांडे घेणार आहोत त्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी ऍड करायचं आहे मग ती जाळी
वरतून ठेवायची आहे त्या जाळीला थोडंसं तेल चव बाजूने सगळीकडून लावून घ्यायचे आहे थोडे
तेलतसेच तेल लावून घेतल्यानंतर आपण जे कोथिंबीर वड्याचे लंबे लंबे गोळे बनवलेले आहे
ते अलगद हाताने त्यावरती ठेवून द्यायचे आहे.
7. तसेच ते ठेवून दिल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यायचे
आहे त्याला चांगल्या प्रकारे पंधरा ते वीस मिनिटानंतर वाफवून घेतल्यानंतर गॅस बंद करून
एका दुसऱ्या ताटामध्ये ते कोथिंबीर वड्याचे गोळे बाहेर काढायचे आहे तसेच बाहेर काढले
की थोडा वेळ त्याला थंड होऊ द्यायचा आहे तसेच थंड होऊ दिल्यानंतर चाकू घेऊन चाकूने
त्याचे गोल गोल काप म्हणजेच गोल गोल कट त्याला करून घ्यायचा आहे.
8. तसेच त्याला गोल गोल कट करून घेतल्यानंतर लगेच एक तवा किंवा पॅन घ्यायचा तसेच तवा किंवा पॅन घेतलेला त्यामध्ये दोन चमचे किंवा तीन चमचे तेल टाकायचे आहे तेल टाकल्यानंतर ज्या वड्यांचे काप आपण कट करून घेतले आहे त्या वड्या तेलामध्ये अलगदपणे सोडून द्यायचे आहे आणि चांगल्या ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत फ्राय करत राहायचे आहे गॅस मंद आचेवर ठेवून फ्राय करायचे आहे कारण वडे हे जळायची शक्यता असते म्हणून मंद आचेवर गॅस करून फ्राय करत राहायचं तसेच दोन्ही बाजूने त्याला फ्राय करायचे आहे एक बाजू कच्ची राहिला नको त्यामुळे दोन्ही बाजूने त्याला फ्राय करत राहायचे आहे.
9. तसेच वड्या फ्राय झाल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये टिशू पेपर ठेवायचा आहे टिशू पेपर ठेवल्यानंतर ह्या वड्या त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे कोथिंबीर वड्या या टिशू पेपर मध्ये याच्यामुळे ठेवायचे आहे की वड्यांना लागलेले जे तेल आहे ते पूर्णपणे शोषून घेतो आणि वड्या ह्या जास्त तेलकट खायला लागत नाही त्यामुळे टिशू पेपर मध्ये ठेवल की ते पूर्ण तेल शोषून घेतो तसेच आपले चमचमीत आणि चवदार वड्या इथे तयार आहे कोथिंबीर वड्या तुम्ही जेवताना किंवा कुठे बाहेर पिकनिकला जाताना नक्कीच घेऊ शकतात तसेच पोळी सोबत कोथिंबीर वडी अगदी चवदार लागते आणि वरण भात सोबत तर ती तोंडी लावायला कोथिंबीर वडी अगदी छान लागते.
विशेष टीप:-
1. कोथिंबीर वडे जेव्हा तुम्ही वाफवून घेता जेव्हा तिला बाहेर काढता तेव्हा तिला थंड
झाल्यावरच कट करायचे आहे गरम गरम जर तिला कट करायला गेले तर ती कट न होता पूर्णपणे
तुटल्या जाईल त्यामुळे थंड झाल्यावरच तिची कटिंग करायची आहे.
2. कोथिंबीर वडी मध्ये तांदळाचे पीठ फक्त एक कप किंवा दोन कपच ऍड करायचा आहे जास्त
ऍड केलं तर ते खाताना व्यवस्थित लागणार नाही म्हणून थोडसं ॲड करायचा आहे आणि तांदळाचे
पीठ हे आवर्जून त्यामध्ये ऍड करायचे आहे कारण कोथिंबीर वड्या चांगल्या खुसखुशीत आणि
कुरकुरीत खायला लागते.
3. तसेच कोथिंबीर वड्या तुम्ही दही सोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा घरात असलेला टोमॅटो
सॉस केचप यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात किंवा घरात अवेलेबल असलेले लोणचं यासोबत देखील
तुम्ही कोथिंबीर वड्या खाऊ शकतात ते अगदी चवदार आणि छान लागेल खायला आणि कोथिंबीर वड्या
थंड झाल्यावर पण खायला छान लागतात.




0 Comments