पनीर भुर्जीचं रेसिपी - स्वादिष्ट आणि झटपट | Paneer Bhurji Recipe In Marathi | Paneer Bhurji Kaise Banaen

पनीर भुर्जीचं रेसिपी - स्वादिष्ट आणि झटपट


पनीर भुर्जीचं रेसिपी - स्वादिष्ट आणि झटपट | Paneer Bhurji Recipe In Marathi | Paneer Bhurji Kaise Banaen

      पनीर या खाद्यपदार्थाचे निरनिराळे प्रकार आहेत पनीर हा खाद्यपदार्थ दुधापासून बनवला जातो तसेच पनीर बनवताना त्याला पनीरच्या मसाल्याची गरज असते त्याशिवाय पनीर चवदार होत नाही दुसरं काही जरी नसलं तरी त्याला पनीर मसाला आणि अद्रक लसणाची पेस्ट हे मात्र पाहिजेत त्यामुळे भाजी चवदार होत नाही अशी खूप लोकांचं म्हणणं आहे पण मित्रांनो मी जे तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे ती थोडी वेगळी आहे आणि बऱ्याच लोकांना माहित देखील नाही हा परंतु मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये ही भाजी अवेलेबल राहते

      तसेच घरगुती पद्धतीने ही भाजी कशी बनवायची आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्या मित्रांनो तुम्हाला कुठे अर्जंट जायचं असेल किंवा तुमच्या मुलांना शाळेत जायची घाई असेल तर कधी कधी पनीरची भाजी पटकन होत नाही झटपट बनत नाही आणि झटपट बनली तर चवदार होत नाही असे काही ना काही छोट्या मोठ्या चुका भाजीमध्ये निघत असतात तसेच बॅचलर मुलं शाळेतील मुलं आणि जॉब ला जाणारे लोक कधी त्यांना पनीर डब्यावरती घेऊन जाऊ वाटलं की ते पटकन बनत नाही आणि थोडा फार उशीर होतो

      तर मित्रांनो आजची मी तुम्हाला जी माझ्या ब्लॉगिंग मध्ये न्यू रेसिपी दाखवणार आहे त्या न्यू रेसिपी मध्ये पनीरची भुर्जी झटपट होते म्हणजेच माझी रेसिपी ही पनीर भुर्जी आहे जिला किसून केल्या जात आणि ती चवदार ही तेवढीच बनते आणि खायला सुद्धा तेवढेच छान लागते

      तसेच जे लोक माझी ब्लॉगिंग बघतात त्यातले काही मांसाहारी पण लोक असतील त्या लोकांमध्ये बरेच लोक अंड्याची भुर्जी बनवून खात असते त्याच पद्धतीत मी पनीर भुर्जी ही तुमच्यासमोर रेसिपी घेऊन आले आहे माझ्या मागे ब्लॉगिंग मध्ये मी तुम्हाला पनीर बटर मसाला ही रेसिपी दाखवली आणि माझ्या ह्या ब्लॉगिंग मध्ये पनीर हाच पदार्थ असून त्याचे वेगळ्या पद्धतीत आपण पनीर भुर्जी बघणार आहोत चला तर मित्रांनो मग बघूया पनीर भुर्जी रेसिपी इन मराठी.

पनीर भुर्जी बनवायची सामग्री-

1. दोन मोठे कांदे.

2. एक टमाटर.

3. एक वाटी चिरलेली कोथिंबीर.

4. तीन चमचे लाल तिखट.

5. एक चमचा हळद.

6. चवीनुसार मीठ.

7. अर्धी वाटी तेल.

8. पावशेर पनीर.

पनीर भुर्जी बनवायची प्रक्रिया-


पनीर भुर्जीचं रेसिपी - स्वादिष्ट आणि झटपट | Paneer Bhurji Recipe In Marathi | Paneer Bhurji Kaise Banaen

    1. सर्वप्रथम आपण पनीर हे एका स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहोत पनीर स्वच्छ पाण्यात धुतल्यानंतर एक मोठा ताट घेणार आहोत ताट घेतल्यानंतर एक किसायची किसणी घेणार आहोत किसणी घेतल्यानंतर पनीर त्यावरती ठेवून ते चांगल्या प्रकारे किसून घ्यायचे आहे तसेच किसणी नेते चांगल्या प्रकारे पनीर किसल्यानंतर ते बाजूला ठेवायचे आहे जर तुम्हाला जाड किस लागत असेल तर तुम्ही जाड भागाने त्याला किसू शकतात आणि जर तुम्हाला बारीक शेव सारखं दिसायचं असेल तर तुम्ही तेवढा बारीक देखील किसू शकतात.


पनीर भुर्जीचं रेसिपी - स्वादिष्ट आणि झटपट | Paneer Bhurji Recipe In Marathi | Paneer Bhurji Kaise Banaen

    2. तर तसेच त्यानंतर आपण दोन कांदे स्वच्छ सोलून आणि सोलून झाल्यावर त्याला धुवून बारीक चिरून घेणार आहोत कांदा हा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे बारीक चिरल्यानंतर तो भुर्जी मध्ये अजून देखील चवदार लागतो त्यामुळे कांदा हा बारीक चिरायचा आहे. तसेच बारीक कांदा बारीक चिरल्यानंतर टमाटर हे घ्यायचे आहे टमाटर स्वच्छ धुऊन ते देखील बारीक कट करून घ्यायचे आहे तसेच टमाटे कट केल्यानंतर कोथिंबीर देखील स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यायची आहे.


पनीर भुर्जीचं रेसिपी - स्वादिष्ट आणि झटपट | Paneer Bhurji Recipe In Marathi | Paneer Bhurji Kaise Banaen

    3. तसेच त्यानंतर आपण एक मोठी कढई घेणार आहोत जर तुमच्याकडे कढई नसेल तर तुम्ही पॅन सुद्धा घेऊ शकतात तसेच कढई घेतल्यानंतर ती गॅसवर मंद आचेवर ठेवायची आहे गॅसवर मंद आचेवर ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे तेल घातल्यानंतर तेल थोडं गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा आहे कांदा कढईमध्ये टाकल्यानंतर तो चांगल्या प्रकारे ब्राऊन रंगाचा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा हा चांगल्या प्रकारे ब्राऊन होऊ द्यायचा आहे थोडा जास्त वेळ त्याला फ्राय होऊ द्यायचे आहे.

    4. तसेच कांदा हा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कट केलेला टमाटर देखील ॲड करायचा आहे आणि ते चांगल्या प्रकारे त्यामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे तसेच टमाटर देखील चांगल्या प्रकारे फ्राय झालं की आपण त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखट टाकल्यानंतर हळद सुद्धा त्यामध्ये ऍड करायची आहे हळद ऍड केल्यानंतर आणि लाल तिखट ऍड केल्यानंतर त्यांना टमाटा आणि कांदा मध्ये चांगले दोन ते तीन मिनिटे फ्राय होऊ द्यायचा आहे.


पनीर भुर्जीचं रेसिपी - स्वादिष्ट आणि झटपट | Paneer Bhurji Recipe In Marathi | Paneer Bhurji Kaise Banaen

    5. ते फ्राय होत आले की लगेचच आपण किसलेला पनीर त्यामध्ये ऍड करणार आहोत ऍड केल्यानंतर चमच्याने चांगलं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे तसेच चमच्याने चांगल्या प्रकारे एकजीव केल्यानंतर त्यावरून चवीनुसार मीठ देखील ऍड करायचे आहे चवीनुसार मीठ ऍड केल्यानंतर परत त्याला हलक्या हाताने चमच्याने हलवून घ्यायचे आहे चमच्याने हलवून घेतल्यानंतर एक झाकण घ्यायची आहे एक झाकण लावून कढई वरती ठेवायच आहे आणि पाच ते सात मिनिटे वाफेमध्ये त्या पनीरच्या भुर्जीला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचे आहे.

    6. तसेच त्यानंतर पाच ते सात मिनिटानंतर चांगल्या प्रकारे ते शिजत आली की झाकण खोलू त्यावर तुम्ही कोथिंबीर स्प्रिंकल करून घ्यायची आहे कोथिंबीर स्प्रिंकल करून घेतल्यानंतर त्याला हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहे आणि प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहे इथे आपली पनीर भुर्जी रेसिपी तयार आहे चला तर मग तुम्ही सुद्धा लवकरात लवकर पनीर भुर्जी रेसिपी बनवा आणि त्या पनीर भुर्जीचा आस्वाद घ्या पनीर भुर्जी जर तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त लाल तिखट ऍड करू शकतात लाल तिखट म्हणजे घरातील लाल मिरची ही आहे पनीर भुर्जी तुम्ही रोटी किंवा चपाती तसेच पुऱ्यांसोबत देखील खाऊ शकतात जेवढी गरम गरम पनीर भुर्जी खाल्ली तेवढी ती चवदार लागते.


विशेष टीप-

    1. पनीर भुर्जी जर तुम्हाला लाल मिरचीमध्ये जर आवडत नसेल तर हिरव्या मिरच्या कट करून देखील तुम्ही पनीर भुर्जी बनवू शकतात तसेच पनीर भुर्जी पोळी सोबत खाताना त्या वरतून तुम्ही लिंबू पिळून देखील खाऊ शकतात तसेच पनीर भुर्जी सोबत तुम्ही कच्चा कांदा देखील खाऊ शकतात.

    2. पनीर भुर्जी ही कढईवर जास्त वेळ गॅस वरती ठेवायची नाहीये जर गॅस वरती जास्त वेळ तिला शिजू दिली तर ती खाली चिटकते आणि खाली चिटकून ती जळायला लागते म्हणून पनीर भुर्जी बनवताना गॅस मंद आचेवर हवा आणि आणि थोडा वेळच त्याला वाफ होऊ द्या.

    3. तसेच पनीर भुर्जी बनवताना त्यामध्ये एकच टमाटा ॲड करून टाकायचा आहे जास्त टमाटा ऍड केलं तर पनीर भुर्जी ही आंबट व्हायची शक्यता असते त्यामुळे त्यामध्ये एकच टमाटर टाका.

    4. बाहेर पिकनिकला किंवा दुसरीकडे कॉलेज आणि शाळा येथे जाताना पनीर भुर्जी डब्यावरती न्यायला अगदी उत्तम आहार आहे बाकीच्या पनीरच्या भाज्या किंवा त्याचे तेलही डब्याच्या बाहेर यायची शक्यता असते पण पनीर भुर्जी ही ड्राय म्हणजे सुखी भाजी असल्यामुळे ती खराब होत नाही आणि त्याचे तेल देखील बाहेर येत नाही त्यामुळे पनीर भुर्जी ही बाहेर नेण्यासाठी अगदी उत्तम आहार आहे.

    5. बरेच जणांना पनीर भुर्जी हा प्रकार माहित नाही मी जेव्हा माझ्या घरी पनीर भुर्जी बनवली तेव्हा त्यांना देखील पनीर भुर्जीचा प्रकार माहित नव्हता पण मी जेव्हा ही भाजी फर्स्ट टाइम केली तेव्हा घरात सर्वांनाच ह्या भाजीची म्हणजेच पनीर भुर्जी ची अत्यंत ओढ लागली आणि सर्वांना ती भाजी आवडायला देखील लागली तुम्ही सुद्धा नक्कीच ही भाजी करून बघा अगदी सोपी आणि साधी पनीर भुर्जी रेसिपी ट्राय करून बघा.

 

तसेच तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !


 
Created by:-  Flavors by Akruti – A Culinary Journey Through Taste and Tradition.

 

0 Comments