झिंग्याची चटणी
झिंग्याची चटणी- झिंग्याची चटणी हा खाद्यपदार्थ मांसाहारी आहे या खाद्यपदार्थाची चव ही एक वेगळीच आहे जी बरेच लोक आवडीने खातात आणि मुंबईमध्ये तर कोळी समाजातील लोक झिंग्याची चटणी ही दररोज आवर्जून खातात आणि कोळी समाजामध्ये हा खाद्यपदार्थ अत्यंत लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे आणि आवडता खाद्यपदार्थ आहे आज मला सुचतच नाही की माझ्या या आजच्या ब्लॉगिंग मध्ये कुठली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू आणि तू मला ती आवडेल हे काय कळतच नाही पण किचनमध्ये जेव्हा गेले तेव्हा मला सुचला हाच तुमच्या सोबत झिंग्याची चटणी शेअर करून बघावी तसेच माझा ब्लॉग बरेच जास्त मांसाहारी लोक जे आहेत ते सुद्धा बघतात तर म्हणलं चला आज ची रेसिपी झिंग्याची चटणी ही शेअर करूया
तसेच तुम्हाला झिंग्याची
चटणी ही नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे तसेच झिंग्याची चटणी ही दोन प्रकारे केली
जाते म्हटलं तर एक लाल मसाल्यामध्ये आणि दुसरी हिरव्या मसाल्यामध्ये तर मित्रांनो आज
मी तुमच्यासोबत झिंग्याची चटणी ही हिरव्या मसाला सोबत झटपट ही कशी बनते ते तुम्हाला
माझ्या आजच्या रेसिपीज मध्ये दाखवणार आहे तसेच झिंग्याची चटणी शरीराला देखील आरोग्यदायी
असते झिंग्याची चटणी जास्त करून बाजरीची भाकरी यासोबत तर अगदी उत्तम लागते बाहेर कुठे
पिकनिकला जाताना तुम्ही झिंग्याची चटणी आणि भाकरी डब्यावर नक्कीच घेऊन जाऊ शकतात तसेच
झिंग्याची चटणी आणि तांदळाची भाकर देखील अगदी उत्तम लागते आणि चवदार लागते खायला बघितलेच
की तोंडाला पाणी सुटायला लागते तर मित्रांनो चला तर मग बघूया झटपट आणि स्वादिष्ट चवदार
लागणारी झिंग्याची चटणी रेसिपी इन मराठी.
झिंग्याची चटणी बनवायची सामग्री-
1. पावशेर झिंगे.
2. दोन ते आठ हिरव्या मिरच्या.
3. दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या.
4. दोन वाटी चिरलेली कोथिंबीर.
5. चवीनुसार मीठ.
6. पुरेसं तेल.
7. पुरेसं पाणी.
झिंग्याची चटणी बनवायची प्रक्रिया-
1. सर्वप्रथम आपण इथे झिंगे हे एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये झिंगे घेणार आहोत
तसेच झिंगे हे घेतल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे निवडून घेणारा आहोत झिंग्याला चांगल्या
प्रकारे निवडून घ्यायचे आहे कारण त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कचरा असतो त्यामुळे त्याला
स्वच्छ निवडून घ्यायचे आहे.
2. तसेच त्याला निवडून घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे दोन पाण्यामध्ये म्हणजेच दोनदा
वेगवेगळ्या पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घेणार आहोत झिंग्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ
धुऊन घ्यायचे आहे कारण त्याला चिटकलेला जो कचरा असतो ते देखील पाण्यातून नाहीसा होतो
म्हणजेच निघून जातो.
3. तसेच त्यानंतर आपण त्या झिंग्यांना एक तवा किंवा पॅन घेणार आहोत तसेच ते घेतल्यानंतर
तवा हा गॅसवर मंद आचेवर ठेवायचा आहे मंद आचेवर ठेवल्यानंतर त्यावरती दोन चमचे तेल ऍड
करायचे आहे आणि तवा थोडा गरम झाला की जे आपण धुतलेले झिंगे आहे ते त्या तव्यावर सोडायचे
आहे आणि सोडल्यानंतर त्याला चमच्याने चांगल्या प्रकारे अलगद ब्राऊन रंगाचे होईपर्यंत
फ्राय करत राहायचे आहे झिंगी हे चांगल्या प्रकारे फ्राय करायचे आहे कारण त्याच्यातला
जो कच्चापणा आहे तो फ्राय केला की निघून जातो.
4. तसेच त्यानंतर झिंगे हे चांगल्या प्रकारे फ्राय केल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये
किंवा ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे आहे तसेच त्यानंतर झिंगे हे बाजूला काढून झाल्यानंतर
आपण त्याचा मसाला तयार करून घेणार आहोत तसेच त्यानंतर हिरव्या मिरच्या या स्वच्छ धुऊन
घ्यायचे आहेत आणि हिरव्या मिरच्या धुतल्यानंतर लसूण सुद्धा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे
आणि तव्यावर एक चमचा तेल ऍड करून ह्या हिरव्या मिरच्या आणि लसूण चांगल्या प्रकारे फ्राय
करायचे आहे आणि त्यासोबतच कोथिंबीर देखील स्वच्छ धुऊन आणि तिला बारीक चिरून ती देखील
त्या तव्यावर ऍड करून ह्या तिघांना एकत्र एकजीव करून चांगल्या प्रकारे फ्राय करायचे
आहे.
5. तसेच चांगल्या प्रकारे त्याला फ्राय करून घ्यायचे आहे या तिघांना चांगल्या प्रकारे
फ्राय करून घेतल्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये या तिघांना एकत्रित पेस्ट करून घ्यायची
आहे तसेच हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि लसूण याची जास्त बारीक पेस्ट करायची नाहीये.
थोडंसं जाडसर पेस्ट अशी बनवायची आहे तसेच याची जाडसर पेस्ट बनवून झाल्यानंतर लगेचच
आपण याला फोडणी द्यायला घेणार आहोत.
6. तसेच एक कढई घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे पातेले असेल तर तुम्ही ते घेऊ शकतात
कढई घेतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल ऍड करायचे आहे गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे
मग तेल ऍड करायचे आहे ते ऍड केल्यानंतर ते थोडे गरम झाले की लगेचच आपण जो हिरव्या मिरच्या
आणि लसूण ची जी पेस्ट बनवली आहे ती पेस्ट आपण त्या कढईमध्ये टाकणार आहोत तसेच कढईमध्ये
टाकल्यानंतर त्याला चमच्याने चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे जास्त वेळ पण
त्याला फ्राय करायचे नाहीये एक दोन ते तीन मिनिटे त्याला फ्राय करत राहायचे आहे.
7. त्याला दोन ते तीन मिनिटे फ्राय केल्यानंतर जे आपण झिंगे हे फ्राय केले होते
ते त्या कढईमध्ये त्या हिरव्या मिरच्या लसणाच्या पेस्टमध्ये ऍड करणार आहोत आणि त्याला
देखील चांगल्या प्रकारे फ्राय करत राहायचे आहे बरेच जणांचे झिंगे हे खाली करायला चिटकतात
तर त्यांनी असं चिटकायला लागले तर त्यावरतून पाण्याचा शिपडा मारायचा आहे म्हणजे ते
खाली चिकटणार नाही तसेच चांगल्या प्रकारे त्याला फ्राय केल्यानंतर गॅस हा मंद आचेवर
ठेवून त्याला झाकून एक दोन ते तीन चार मिनिट चांगलं वाफवून द्यायचं आहे तसेच दोन ते
चार मिनिटे झाले की झाकण खोलून परत एकदा हलक्या हाताने त्याला हलवायचे आहे आणि गॅस
हा बंद करायचा आहे.
8. तर मित्रांनो इथे आपली झिंग्याची चटणी ही रेसिपी तयार आहे ही रेसिपी अगदी साधी
आणि सरळ आणि पटकन झटपट बनणारी आहे जर तुम्हाला झिंग्याची चटणी ही लाल मसाल्यात करायची
असेल तर बाजारात मिळणारा कांदा लसूण चा लाल तिखट मसाला तुम्ही हिरव्या मिरच्या च्या
जागी ऍड करून सेम ह्याच प्रोसेस मध्ये बनवू शकतात आणि जर तुम्ही लाल मसाल्यात केली
झिंग्याची चटणी तर वरतून गार्निशिंग साठी तुम्ही कोथिंबीर देखील स्प्रिंकल करून शकतात.
9. तर इथे आपले झिंग्याची चटणी ही तयार आहे लवकरात लवकर तुम्ही देखील बनवून याचा
आस्वाद घ्या आणि आवर्जून तिला खावी तसेच झिंग्याची चटणी ही पोळी सोबत देखील अगदी छान
लागते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाकरी किंवा पोळी सोबत झिंग्याची चटणी खाऊ शकतात.
विशेष टीप-
1. झिंग्याची चटणी बनवली की ती बऱ्याच दिवस फ्रीजमध्ये तुम्ही तिला स्टोअर करून
ठेवू शकतात आणि ती खराब देखील होत नाही जर तिला वर ठेवली तर ती खराब व्हायची शक्यता
असते.
2. झिंग्याची चटणी ही जर तुम्हाला थोडी ग्रेव्हीमध्ये बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये
थोडं पाणी ऍड करून तिला चांगल्या प्रकारे शिजू देऊ शकतात आणि टमाट्याची फोडणी देखील
देऊन तुम्ही तिला बनवू शकतात तसेच झिंग्याची चटणी ही कांदा फ्राय मध्ये पण अगदी छान
लागते आणि वेगवेगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा ती चवदार लागते म्हणजेच झिंग्याची चटणी वांग्यामध्ये
आणि घरातील डाळी म्हणजेच तुरीची आणि मसुरची डाळ या मध्ये सुद्धा जर तिला बनवली तर ती
अगदी चवदार लागते.
3. तसेच झिंग्याची चटणी तुम्ही तोंडी लावायला जेवताना खाऊ शकतात म्हणजेच खिचडी सोबत सुद्धा तुम्ही झिंग्याची चटणी खाऊ शकतात.
0 Comments